शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात

By admin | Updated: March 25, 2017 01:43 IST

पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे

मयूर तांबडे / पनवेलपनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे, तर काही पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. पनवेलमध्ये खरी लढत शेकाप व भाजपामध्ये होणार असली तरी इतर पक्ष आपापले उमेदवार उभे करून टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहेत, तर मनसेने एकला चलोची भूमिका घेतलेली दिसत आहे.रायगड जिल्ह्यातील पहिल्याच पनवेल महापालिकेची निवडणूक लवकरच होत आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपापल्या पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. साऱ्याच पक्षात इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे उमेदवार निवडताना पक्ष प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शेकाप व काँग्रेसमध्ये आघाडी झालेली आहे. या आघाडीत राष्ट्रवादीदेखील सामील झाली आहे. पनवेलमध्ये २००४ पासून रामशेठ ठाकूर विरुद्ध विवेक पाटील अशीच लढाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या महापालिकेच्या निवडणुकीत देखील ठाकूर विरु द्ध पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी पनवेल परिसरात सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहचण्याची एकही संधी उमेदवार सोडत नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर, चौकांत, रेल्वे स्थानकात लावण्यात आलेल्या बॅनरबाजीतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात आघाडी झालेली आहे, तर शिवसेना व भाजपा यांच्यात युतीचे घोंगडे भिजत पडले आहे. मनसे स्वबळावर निवडणुका लढवण्यास सज्ज आहे. भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या तर त्याचा फायदा शेकाप आघाडीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेकापला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपा व शिवसेनेची युती व्हावी अशी काहींची इच्छा आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांत चुरस पाहावयास मिळणार आहे. पनवेलमध्ये कोण बाजी मारणार, यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. निवडणुकीत अनेक जण पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज उमेदवारांमुळे पक्षाला बंडखोरीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.