शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day: वाशीत ‘वीरभद्रासन’चा होणार विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:23 IST

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सिडकोच्या माध्यमातून भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सिडकोच्या माध्यमातून भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेने या शिबिरात अधिकाधिक योगसाधकांकडून तीन मिनिटांत ‘वीरभद्रासन’ करवून जागतिक विक्रम करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या शिबिराकडे योगसाधकांचे विशेष लक्ष लागले आहे. या शिबिरासाठी वाशीच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार २०१५ पासून प्रत्येक वर्षी २१ जून रोजी जगभरात योग शिबिराचे आयोजन करून योगाचा प्रचार केला जातो. प्राचीन भारतात योगविद्या हे शारीरिक व मानसिक स्वास्थ तसेच आत्मिक उन्नतीचे एक उच्च प्रतीचे साधन मानले गेले आहे. आजच्या धाकधुकीच्या व तणावाच्या जीवनात उत्तम आरोग्य व मानसिक स्वास्थ राखण्यासाठी योगसाधनेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांत योगविद्येचा व्यापक प्रमाणात प्रचार करण्यात येत आहे. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये या शिबिरासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकाच वेळी सुमारे पाच हजार नागरिक सहभागी होतील, या दृष्टीने येथे सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पावसाचे दिवस असल्याने नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेतर्फे देशातील निवडक २२ ठिकाणी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून योगसाधनेचे धडे दिले जाणार आहेत. यात सलग तीन मिनिटे ‘वीरभद्रासन’च्या विश्वविक्रमांची गिनिज बुकात नोंद केली जाणार आहे. या २२ ठिकाणांत वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरचा समावेश आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत हे शिबिर संपन्न होणार असून, नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.नवीन पनवेलमध्ये योग शिबिराचे आयोजनपतंजली योग समिती पनवेल व रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या वतीने नवीन पनवेल येथे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. पनवेल परिसरातील नागरिकांना सामूहिक योगाभ्यास करता यावा या उद्देशाने नगरसेवक संतोष शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. सेक्टर-८ येथील गोकुळ डेरीसमोरील मैदानावर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्र माचे उद्घाटन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी महापौर कविता चौतमोल, उपमहापौर विक्र ांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर आदींसह पालिकेचे नगरसेवक, नवीन पनवेलमधील नागरिक उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन