शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’ क्षेत्राऐवजी महानगरपालिकेत समाविष्ट करा

By admin | Updated: January 18, 2016 02:10 IST

‘नैना’ क्षेत्रबाधित गावातील ग्रामस्थांनी नैना प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. या भागाचा नियोजनबध्द विकास करायचा असेल तर त्या बदल्यात आम्हाला महानगरपालिकेत

पनवेल : ‘नैना’ क्षेत्रबाधित गावातील ग्रामस्थांनी नैना प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. या भागाचा नियोजनबध्द विकास करायचा असेल तर त्या बदल्यात आम्हाला महानगरपालिकेत समाविष्ट करून घ्या, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. याकरिता या भागातील ग्रामपंचायतीत ठराव संमत करणार आहे. यामुळे नैना प्रकल्पासमोर आणखी आव्हान निर्माण झाले आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या परिसरातही नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे केवळ बिनशेती त्याचबरोबर नगररचना विभागाच्या परवानगीबरोबर सिडकोकडूनही बांधकामास परवानगी घेणे बंधनकारक आहे. नैना क्षेत्रांतर्गत होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार या ठिकाणी काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना वेगवेगळ्या प्रकारचे १५ ते २० नाहरकत दाखले घेणे बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्रे जमा करताना नाकीनऊ येतात. याशिवाय नैना क्षेत्रातील विकास शुल्क प्रतिगुंठा तीन लाख केल्याशिवाय परवानगी दिली जात नाही. जमीन मालकांना दिला जाणाऱ्या मोबदल्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली जात नसल्याचे याठिकाणी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे नामदेव फडके यांचे म्हणणे आहे. नैना क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. या विरोधात एक चळवळ उभी करण्यात येत असून त्यात गावातील लोकांनी सहभाग नोंदवला आहे. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, पी.बी. सावंत, आमदार विवेक पंडित, उल्का महाजन, सुरेखा दळवी, अंजली दमानीया यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. (वार्ताहर)