शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माहिती मागवणाऱ्यांची होणार नोंद

By admin | Updated: September 12, 2016 03:26 IST

माहितीचा अधिकार कायद्यामुळे सरकारी विभागात होणाऱ्या भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसला आहे. विविध सार्वजनिक प्राधिकरणाकडून

आविष्कार देसाई,  अलिबागमाहितीचा अधिकार कायद्यामुळे सरकारी विभागात होणाऱ्या भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसला आहे. विविध सार्वजनिक प्राधिकरणाकडून वेगवेगळ््या नमुन्यात माहिती उपलब्ध करुन देण्यात येते मात्र माहिती मागणऱ्या अर्जादारांच्या माहितीची नोंद ठेवण्याची व्यवस्था नव्हती. सरकारच्या निर्णयानुसार आता माहिती मागणाऱ्या अर्जदाराच्या इंतभूत माहितीचे संकलन केले जाणार आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांवर सरकारचे लक्ष राहणार आहे. यामुळे भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्यां अर्जदारांची बदनामी टळणार आहे.माहितीचा अधिकार हा कायदा २००५ साली अस्तित्वात आला. माहितीचा अधिकार पारित करावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढाकार घेतला होता. महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरु केली. सरकारी योजनांमध्ये मोठ्या संख्येने आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याने सरकारने माहिती अधिकार कायद्याचा अंकुश ठेवला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करण्याच यश आले. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर माहिती अधिकाराचा वचक बसल्याने उलटसुलट प्रकरणांनान चांगलीच खिळ बसली असल्याचे विविध उघड झालेल्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणावरुन सहज लक्षात येते.माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करुन आपापली आर्थिक पोळी भाजणारे महाभागही आहेत. परंतु सरकारी यंत्रणांकडे माहिती अधिकारात माहिती मागणाऱ्या अर्जदाराची ढोबळ माहिती असायची. तसेच कोणत्या अर्जदाराने कोणत्या प्राधिकरणाकडे कोणती माहिती मागितली आहे, अर्जदार हा दारिद्र रेषेखालील आहे का, अर्ज कधी दाखल केला, माहिती नाकरली काय, कोणत्या कलमाच्या खाली नाकारली, प्रथम अपिल झाले आहे का, माहितीचे शुल्क त्याची तारखी यासह अन्य बाबींची नोंदणी माहितीचा अधिकार अर्ज प्राप्त होणाऱ्या संबंधित प्राधिकरणाला ठेवावी लागणार आहे.माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या अधिकाराचा वापर करुन आर्थिक तडजोडी करणाऱ्यांना नोंदी ठेवल्यामुळे आळा बसणार आहे, तसेच अर्जावरच्या कार्यवाहीचा सुस्पष्ट अहवाल सरकारला प्राप्त होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले. प्राधिकरणाला ठेवावी लागणार माहिती : कोणत्या अर्जदाराने कोणत्या प्राधिकरणाकडे कोणती माहिती मागितली आहे, अर्जदार हा दारिद्र रेषेखालील आहे का, अर्ज कधी दाखल केला, माहिती नाकरली काय, कोणत्या कलमाच्या खाली नाकारली, प्रथम अपिल झाले आहे का, माहितीचे शुल्क त्याची तारखी यासह अन्य बाबींची नोंदणी माहितीचा अधिकार अर्ज प्राप्त होणाऱ्या संबंधित प्राधिकरणाला ठेवावी लागणार आहे.