शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांची माहिती गुलदस्त्यात

By admin | Updated: February 15, 2016 03:11 IST

शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी तसेच शासकीय दाखले काढण्यासाठी अडचणी येऊ नयेत, म्हणून ही माहिती सार्वाजनिक करण्याच्या दृष्टीने पनवेल

वैभव गायकर,  पनवेलशासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी तसेच शासकीय दाखले काढण्यासाठी अडचणी येऊ नयेत, म्हणून ही माहिती सार्वाजनिक करण्याच्या दृष्टीने पनवेल तहसील कार्यलयाच्या वतीने कार्यालयाबाहेर एलईडी स्क्र ोलिंग डिस्प्ले बसविण्यात आले. मात्र काही दिवसांच्या कालावधीनंतरच हा स्क्रीन बंद पडल्याने हा केवळ फार्स असल्याचे बोलले जात आहे. समाजातील विविध मागास प्रवर्गातील जनता आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय योजना अमलात आणल्या जातात. अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा सरकारकडून होतात. मात्र लाभार्थ्यांना याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. दलाल याचा गैरफायदा घेऊन पैसे उकळण्याचे काम करीत असतात. विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती नागरिकांना मिळत नाही. दाखले सरकारी कार्यालयांमधून कसे मिळवायचे, मतदार नोंदणी कशी करायची, स्पर्धा परीक्षा तसेच महसूल विभागात चालणारे कामकाज याची माहिती सर्वसामान्यांना नसते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असतात. अनेकदा सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागतात. यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक अभिनव संकल्पना समोर आणली गेली होती. ही संकल्पना जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांत राबवली गेली. प्रत्येक तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागावर मोठ्या आकाराचा एलईडी टीव्ही लावण्यात आला. या टीव्हीमध्ये सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी होणारे चावडी वाचन, फेरफार अदालत तसेच ई-अभिलेख, समाजकल्याण विभागाच्या संजय गांधी योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ योजना अशा विविध योजनांसाठी कोण कोण पात्र आहे अथवा त्याच्या पात्रतेसंदर्भात माहिती, त्यांचा लाभ कसा घेत येईल तसेच पुरवठा विभागाच्या योजना या डिस्प्लेद्वारे नागरिकांना वाचायला मिळत होत्या. शासनाने जाहीर केलेल्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना नसते. दलाल याचाच गैरफायदा घेत असतात. योजनाबद्दल माहिती देऊन आमच्यामार्फत हे काम करून घेतल्यास तुमची कामे लवकर होतील, अशी बतावणी करून सर्वसामान्यांना लुबडण्याचे प्रकार होऊशकतात. त्यामुळे संबंधित यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. यासंदर्भात पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांना विचारणा केली असता लवकरात लवकर हे एलईडी स्क्र ोलिंग डिस्प्ले सुरू करण्यात येईल असे सांगितले.