शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

बाप्पाच्या अलंकारांना वाढती मागणी

By admin | Updated: September 2, 2016 03:57 IST

गणेशोत्सवासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. गणेश मूर्तींचे सौंदर्य खुलविण्यासाठी दागिन्यांना विशेष

- प्राची सोनवणे, नवी मुंबई

गणेशोत्सवासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. गणेश मूर्तींचे सौंदर्य खुलविण्यासाठी दागिन्यांना विशेष महत्त्व आहे. घरातला बाप्पा असो वा मंडळातला प्रत्येक गणेशभक्तांना मूर्ती सजविण्याची हौस असते आणि तीच हौस पूर्ण करण्यासाठी हल्ली बाजारात विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोने-चांदीच्या दागिन्यांना वाढती मागणी असल्याने व्यापाऱ्यांचा धंदा तेजीत सुरु आहे. लाडक्या बाप्पाला सोन्याच्या दागिन्यांनी सजविण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची लगबग पहायला मिळते. भाविकांना मनाजोगे दागिने उपलब्ध व्हावेत याकरिता सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे. दिवसेंदिवस सोने-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे दागिने खरेदीचा जोर तसा कमी झाल्याने बाप्पासाठी सोन्याच्या पाण्याचा वापर करून घडविलेले दागिने, हुबेहूब सोन्यासारखे दिसणाऱ्या दागिन्यांचा ट्रेंड वाढला आहे. बाप्पांची मूर्ती चांदीच्या दागिन्यांनी सजविण्यास मंडळांचे अधिक प्राधान्य दिसून येत आहे. चांदीचा पत्रा तयार करून मूर्तीच्या मापानुसार संबंधित दागिन्याचे कच्चे नक्षीकाम करण्यात येते. पेन्सिलने तयार केलेले हे नक्षीकाम चांदीच्या पत्र्यावर चिटकविले जाते. लाख, खिळे आणि हातोडी यांच्या साह्याने अंतिम नक्षीकाम तयार केले जात असल्याची माहिती व्यापारी दिनेश मेहता यांनी दिली. मूर्ती सजविण्यासाठी मोत्यांची माळ, डायमंड ज्वेलरी तसेच इकोफ्रेंडली बाप्पासाठी कागदापासून तयार केलेले दागिने, फुलांपासून तयार केलेल्या माळांचा वापर केला जात आहे.दागिन्यांचे प्रकारविविध ज्वेलर्स ब्रॅण्डने बाप्पाचे उपरणे, गोल्ड प्लेटेड मोदक कंठी, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादी प्रकारातला चांदीचा ड्रायफ्रूट सेट, गोल्ड प्लेटेड पाच फळं, उंदीर आदी प्रकारचे दागिने आपल्याला पाहायला मिळतील. मुकूट, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगण, कुंडल, दुर्वांचा हार, जास्वंदीचा हार, केळीचं पान, मोदकाची चळ, जाणवं, बाजुबंद, लामणदिवा, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टँड, फुलपरडी, नंदादीप आदींना वाढती मागणी आहे.