शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांच्या भूखंडांचे उद्घाटन रद्द

By admin | Updated: April 1, 2016 02:51 IST

खारघर शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोहीम उघडली होती.

पनवेल : खारघर शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोहीम उघडली होती. अनधिकृत फेरीवाल्यांना हटवून त्यांना मार्केट उपलब्ध करुन देण्याची आग्रही भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली होती. त्यानंतर सिडकोने तात्पुरत्या स्वरुपात २४ भूखंड देण्याचे मान्य केले होते. यापैकी काही भूखंडांचे उद्घाटन गुरुवार ३१ रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडणार होते तशी तयारीही पूर्ण झाली होती. मात्र ऐन वेळी उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द झाल्याने यामागचे कारण मात्र स्पष्ट होवू शकले नाही. विशेष म्हणजे फेरीवाल्यांच्या प्रश्नावरुन भाजपा-शिवसेना अनेक दिवस आमनेसामने आलेले आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी मात्र दोन्ही पक्ष एकत्र झाल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे उद्घाटनासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे खारघरमध्ये देखील आले होते. मात्र कोणत्या कारणास्तव त्यांनी उद्घाटन करण्यास नकार दिला हे स्पष्ट झाले नाही. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. या सर्व घटनाक्रमानंतर भाजपाचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल हे शिष्टमंडळासह खारघर सिडको कार्यालयात गेले. सिडकोमार्फत फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती सिडकोकडे केली.