शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

तहकूब विषयाला परस्पर मंजुरी!

By admin | Updated: October 1, 2016 02:57 IST

पनवेल शहर महानगरपालिका अस्तित्वात येत असल्याने नागरिकांबरोबरच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १ आॅक्टोबरपासून पनवेल महापालिकेवर प्रशासक बसणार

- वैभव गायकर,  पनवेलपनवेल शहर महानगरपालिका अस्तित्वात येत असल्याने नागरिकांबरोबरच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १ आॅक्टोबरपासून पनवेल महापालिकेवर प्रशासक बसणार असल्याने सत्ताधाऱ्यांनी घाईघाईत महानगर गॅस कंपनीच्या पाइपलाइन टाकण्याच्या तहकूब असलेल्या विषयाला परस्पर मंजुरी दिल्याने विरोधकांनी शुक्रवारी मुख्याधिकारी मंगेश चितळे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन देऊन हा ठराव रद्द करण्याची मागणी केली. महानगर गॅससाठी परवानगी मिळावी म्हणून नगरपालिकेस तीन अर्ज करण्यात आले होते. मात्र त्या तिन्ही विषयाला वारंवार पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थगिती मिळून ते विषय तहकूब करण्यात आले होते. यासंदर्भात सर्वपक्षीय समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र २५ सप्टेंबर रोजी या विषयी कोणतीही बैठक न घेता नगराध्यक्षांनी परस्पर अधिकाराने सही करून ठराव केले असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुडेकर व विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना भेटून उचित कारवाईची मागणी केली आहे. ठराव मंजूर करण्यामागे आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप पाटील यांनी केला. निवेदन देताना विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांच्यासह शिवसेना पक्ष प्रतोद रमेश गुडेकर, गणेश कडू, शिवदास कांबळे, निर्मला म्हात्रे, सुनील बहिरा आदी यावेळी उपस्थित होते . महानगरपालिकेच्या अंतिम मंजुरीने पनवेल नगरपरिषदेचा कार्यकाळ आज संपणार असून शेवटचा दिवस होता. १ आॅक्टोबरपासून प्रशासक बसणार असल्याने शेवटचा दिवस देखील वादात पार पडल्याचे दिसून आले. महानगर गॅस कंपनीच्या संदर्भात यापूर्वी झालेल्या दोन्ही बैठकांना मी उपस्थित नव्हतो. यासंदर्भात शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. - मंगेश चितळे, मुख्याधिकारी , पनवेल नगरपरिषद हा ठराव पनवेलच्या जनतेच्या भल्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले नाही. - चारु शीला घरत, नगराध्यक्षा, पनवेल नगरपरिषद