शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीजवळ अवैध माती उत्खनन

By admin | Updated: March 10, 2016 02:20 IST

तालुक्यात अनधिकृत उत्खनन सुरू असल्याचा आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजरोसपणे खोपोली शहराजवळ असणारा डोंगर पोखरला जात असताना

खालापूर : तालुक्यात अनधिकृत उत्खनन सुरू असल्याचा आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजरोसपणे खोपोली शहराजवळ असणारा डोंगर पोखरला जात असताना मातीमाफियांविरोधात कारवाईची मागणी होत आहे. शासकीय सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत असल्याने खालापूर प्रशासन भरारी पथकद्वारे यावर नियंत्रण मिळवणार आहे. खालापूर तहसीलदार अजित नैराळे यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ खोपोली-पेण मार्गावरील तांबाठी येथील गोदरेज कंपनीमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या उत्खननाला चाप लावत तब्बल २ कोटी ५७ लाखांचा दंड ठोठावल्याने नैराळे यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. मात्र संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात दगड-मातीचे उत्खनन सुरू असल्याने त्याच्या तक्रारी तहसील कार्यालयात दाखल होत आहेत. खोपोली शहराजवळील हॉटेल रिशीवनसमोरील डोंगर गेली अनेक वर्षे पोखरला जात आहे. अलीकडे पाली फाटा येथे नव्याने निर्माण केल्या जाणाऱ्या ट्रक टर्मिनलच्या भरावासाठी याच ठिकाणाहून मातीचे उत्खनन सुरू आहे. शनिवार, रविवार आणि इतर सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पोकलेन मशिन, डंपरच्या साहाय्याने मातीचे उत्खनन करून वाहतूक करण्यात येत असल्याने मातीमाफिया प्रशासनाला अंधारात ठेऊन मातीची तस्करी करीत आहेत. डोंगर पोखरला जात असताना महसूल अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कडक कारवाईची मागणी होत आहे. जमीनमालक आणि उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत महसूल प्रशासनाकडून मिळत आहेत .