शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नवी मुंबई एअरपोर्टजवळील उलवे खाडीत अवैध रेती उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 21:29 IST

नवी मुंबई आंतराष्ट्रीय परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर  रेती उपसा होत असल्याचे उघड झाले आहे.

वैभव गायकर नवी मुंबई आंतराष्ट्रीय परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर  रेती उपसा होत असल्याचे उघड झाले आहे.शनिवारी महसूल विभागाने टाकलेल्या धाडीत भरारी पथकाच्या हाती केवळ 16 ब्रास रेती लागली.मात्र रेती उपसा करणाऱ्याबाबत महसूल विभागाला कसलीच माहिती हाती लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

नवी मुंबई विमानतळ उभे राहत असलेल्या वाघिवली ते जुई कामोठे खाडी यासह चिंचपाडा ,कोपर याठिकाणी महसूल विभागाने धाड टाकली सोबत पोलिसांचा फौजफाटा देखील होता.मात्र रेती उत्खनन करण्यासाठी खाडीत असलेले पाईप ,रेती साठा करण्यासाठी असलेले हौद या व्यतिरिक्त केवळ 16 ब्रास रेती महसूल विभागाच्या हाती लागले.उलवा खाडीत मोठ्या प्रमाणात रेती उपसा केली जाते .या अवैध्य धंदयांत काही महसूल विभागातील अधिका-यांचे हात देखील काळे झाले आहेत.अशा परिस्थितीत महसूल विभागाला अशाप्रकारे अवैध्य धंदे करणाऱ्याबत काहीच माहिती मिळत नाही हि आश्चर्याची बाब आहे.काही दिवसापूर्वी देखील पनवेल तालुक्यातील अशाच प्रकारे अनेक वर्षांपासून बेकायदेशीर क्रशर (कोऱ्या ) महसूल विभागाने कारवाई करून बंद पाडले.अनेक वर्षांपासून हा बेकायदेशीर व्यवसाय सुरूच होता.

उलवे खाडीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत सक्शन पंप ,होड्या आदी काहीच महसूल विभागाला सापडले नसल्याने महसूल विभागातील या अवैध्य धंद्याशी लागेबांधे असलेल्या कर्मचाऱ्यांनी रेती उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांना माहिती दिल्याने केवळ 16 ब्रास रेतीच महसूल विभागाच्या हाती लागल्याची चर्चा आहे.

तक्रारप्राप्त झाल्यावर संबंधित ठिकाणी धाड टाकुन कारवाई करण्यात आली.घटनास्थळी कोणी सापडले नाही.अशाप्रकारे कारवाई सुरूच राहणार आहे.-विजय तळेकर (तहसीलदार ,पनवेल )

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका