शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील रस्त्यावर अवैध पार्किंग

By admin | Updated: March 14, 2017 02:10 IST

उरण द्रोणागिरी नोड परिसरात सिडको, जेएनपीटीने अवजड वाहनांसाठी अधिकृतपणे वाहने पार्किंगची व्यवस्था करुन दिली असली तरी हजारो वाहने

उरण : उरण द्रोणागिरी नोड परिसरात सिडको, जेएनपीटीने अवजड वाहनांसाठी अधिकृतपणे वाहने पार्किंगची व्यवस्था करुन दिली असली तरी हजारो वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहेत. अनधिकृत पार्किंगकडे वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आर्थिक साटेलोेटे असल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस चालढकलपणा करीत असल्याचा आरोप होत आहे. वाहतूक नियंत्रण विभागाच्या अनधिकृत पार्र्किंगकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने उरण परिसरात वाहतूक कोंडीची समस्या वाढतच चालली आहे. यामुळे मात्र अधिकृत पार्किंग करणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामारे जावे लागत आहे. उरण परिसरात जेएनपीटी, डी.पी.वर्ल्ड, जीटीआय अशी तीन अत्याधुनिक बंदरे आहे. त्याशिवाय ओएनजीसी, जीटीपीएस, एनएडी, बीपीसीएलसारख्या कंपन्यांबरोबरच अनेक रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. जेएनपीटी बंदर आणि त्या आधारित असलेल्या शेकडो कंटेनर गोदामातून मोठ्या प्रमाणात कंटेनर आयात-निर्यातीच्या मालाबरोबरच इतर मालाची वाहतूक प्रचंड प्रमाणात केली जाते. परिसरात कंटेनर मालाची ने-आण करणाऱ्या हजारो वाहनांसाठी सिडको, जेएनपीटीने अनेक ठिकाणी अधिकृतपणे पार्र्किंगची व्यवस्थाही केली आहे. परंतु अशा अधिकृत पार्किंगची संख्या अपुरी आहे. तसेच त्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने अनेक वाहने अनधिकृतपणे मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्र्किंग करतात. दुतर्फा रस्त्यांच्या बाजूने अनधिकृतपणे उभ्या करण्यात येत असलेल्या पार्किंगमुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. उरण, द्रोणागिरी परिसरात दुतर्फा रस्त्यांच्या बाजूला अवैधपणे पार्र्किंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक नियंत्रण पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. वाहतूक कोंडीची समस्या वाढण्याबरोबरच भविष्यात एखाद्या दुर्घटनेची शक्यता दिवसेंदिवस बळावत आहे.