शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

झुणका भाकर केंद्रे की हॉटेल्स?

By admin | Updated: April 20, 2016 02:34 IST

युती शासनाच्या काळात वाटप करण्यात आलेली शहरातील झुणका भाकर केंद्रे सुसाट सुटली आहेत. बहुतांशी केंद्रांचे आलिशान हॉटेल्समध्ये रूपांतर झाले आहे

नवी मुंबई : युती शासनाच्या काळात वाटप करण्यात आलेली शहरातील झुणका भाकर केंद्रे सुसाट सुटली आहेत. बहुतांशी केंद्रांचे आलिशान हॉटेल्समध्ये रूपांतर झाले आहे. महापालिकेचा परवाना आणि मालमत्ता विभागाच्या मेहरनजरेमुळे या केंद्र चालकांचे चांगलेच फावले आहे. या परिस्थितीला महापालिकेचे बोटचेपे धोरण जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.शिवसेना-भाजपा युती सरकारच्या काळात गरिबांना एक रुपयात झुणका भाकर मिळावी या उद्देशाने राज्यभर झुणका भाकर केंद्रे सुरू करण्यात आली होती. विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे तसेच राजकीय वजन असलेल्या व्यक्तींना या केंद्रांचे वाटप करण्यात आले होते. नवी मुंबईत अशा प्रकारची जवळपास ३८ झुणका भाकर केंद्रे आहेत. सुरुवातीला झुणका भाकर विकणाऱ्या या केंद्रांना हळूहळू स्नॅक्स सेंटरचे स्वरूप आले. मागील काही वर्षांत तर या केंद्राच्या ठिकाणी आलिशान हॉटेल्स उभारली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व केंद्रे अद्याप शासनाच्या अत्यारीखत आहेत. त्यामुळे स्थानिक प्राधिकरणांनी आपापल्या क्षेत्रातील ही केंद्रे ताब्यात घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २00५ मध्ये दिले होते. त्यानुसार राज्यातील काही महापालिकांनी त्याची अंमलबजावणीही केली आहे. परंतु नवी मुंबईत यादृष्टीने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. विशेष म्हणजे शहरातील बहुतांशी झुणका भाकर केंद्रे पदपथ आणि रस्त्यावर उभारली आहेत.महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मागील काही वर्षांत या केंद्रांच्या जागेवर पक्के बांधकाम उभारले आहे. हे बांधकाम करताना स्थानिक प्राधिकरण म्हणून महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. असे असतानाही परवाना विभागाकडून या केंद्रांना रीतसर व्यवसाय परवाना देण्यात आला आहे. तसेच नळजोडण्याही देण्यात आल्या आहेत. त्या बदल्यात या केंद्रांकडून महापालिकेला कोणत्याही प्रकारचा कर मिळत नाही. ही वस्तुस्थिती असतानाही प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. (प्रतिनिधी)> शहरातील झुणका भाकर केंद्रांसंदर्भात महापालिका नवीन धोरण तयार करीत आहे. याअंतर्गत ही केंद्रे ताब्यात घ्यायची की सध्या ज्यांच्या ताब्यात आहेत, त्यांनाच अटी व शर्तीवर चालवायला द्यायची. त्यात कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ विकले जावेत, कर आकारणीचे स्वरूप आदी बाबींचा समावेश असेल, अशी माहिती महापालिकेच्या सूत्राने दिली.