शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."
3
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
4
धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण
5
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
6
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
7
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
8
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
9
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
10
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
11
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
12
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
13
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
14
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
15
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
16
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
17
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
18
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
19
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
20
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली

होमगार्ड अधिकाऱ्याने घेतली लाच

By admin | Updated: March 4, 2016 01:54 IST

येथील होमगार्ड विभागाचे प्रभारी अधिकारी धनराज राजपूत यांना २००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून लाच

नेरळ : येथील होमगार्ड विभागाचे प्रभारी अधिकारी धनराज राजपूत यांना २००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून लाच घेणारा होमगार्ड विभागाचा प्रभारी अधिकारी राजपूत याला अलिबाग येथील सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.राज्य गृह विभागातील सुरक्षाविषयक बाब सांभाळत असलेल्या गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड विभागाचे जनतेला सुरक्षा देण्याचे सर्वत्र काम सुरु आहे. रायगड जिल्हाअंतर्गत गृहरक्षक दलाचे कर्जत तालुक्याचे कार्यालय नेरळ-कशेळे राज्यमार्गावरील कोल्हारे चारफाटा येथे आहे. तेथे धनराज बाबूसिंग राजपूत हे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे कर्जत तालुक्यातील २०० होमगार्डचा बंदोबस्त तसेच ड्युटी लावण्याची जबाबदारी जिल्हा गृहरक्षक नियंत्रक यांनी लावून दिली आहे. ते काम शासनाच्या नियमानुसार करण्याऐवजी प्रभारी अधिकारी राजपूत हे आपल्या पदाचा वापर ड्युटी लावत असताना सुरक्षा रक्षक यांच्याकडून आपला स्वत:चा आर्थिक फायदा होईल का यासाठी करीत असल्याच्या चर्चा होत्या. त्या कार्यालयाशी संलग्न असलेल्या एका कर्मचाऱ्याकडे प्रभारी अधिकारी राजपूत हे पैशाची मागणी करीत होते. परिस्थिती बेताची असल्याने ड्युटी लावून घेण्यासाठी प्रभारी अधिकारी राजपूत यांची मागणी पूर्ण करता येत नव्हती. त्यामुळे नेरळ होमगार्ड कार्यालयाशी संबंधित असलेल्या त्या स्थानिक होमगार्डने अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयत २९ फेब्रुवारीला तक्र ार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक व्ही. एल. आर्डेकर यांनी होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या तक्र ारीची खातरजमा करून घेतली. त्यानंतर त्यांनी २ मार्चला सापळा रचला. बुधवारी सायंकाळी नेरळ रेल्वे स्टेशनच्या फलाट एकवर तक्र ारदार यांच्याकडून २००० रु पये लाच घेताना रंगेहाथ पकडले. रायगड लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक आर्डेकर, सहाय्यक फौजदार भोईर तसेच कर्मचारी पाटील, शिर्के, मगर यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. नेरळ स्टेशनवरील रेल्वे पोलीस स्टेशनमधील आऊटपोस्ट यांच्याकडे नोंद करून कर्जत रेल्वे पोलीस स्टेशनवरील मुख्य कार्यालयात लाच घेतलेल्या गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा झाली. (वार्ताहर)