शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदर्शनातून उलगडला आंदोलनाचा इतिहास

By admin | Updated: January 12, 2017 06:18 IST

नेरूळमधील आगरी कोळी महोत्सवामध्ये चरीकोपरचा ऐतिहासिक शेतकरी संप ते भूमिपुत्रांच्या

नवी मुंबई : नेरूळमधील आगरी कोळी महोत्सवामध्ये चरीकोपरचा ऐतिहासिक शेतकरी संप ते भूमिपुत्रांच्या गरजेपोटी घरांपर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो नवी मुंबईकरांना भूमिपुत्रांच्या इतिहासाची ओळख करून देण्यात येत आहे. आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने आयोजित महोत्सवाला रोज ८ ते १० हजार नागरिक उपस्थित राहू लागले आहेत. आगरी कोळीगीते, लावण्या व मराठी लोककलांच्या कार्यक्रमांसह येथील देवी-देवतांचे दर्शन आणि भूमिपुत्रांच्या यशोगाथेचे प्रदर्शन पाहण्यासाठीही नागरिक गर्दी करत आहेत. आगरी कोळी भूमिपुत्रांच्या कर्तृत्वाची माहिती नवी मुंबईसह परिसरातील नागरिकांना करून देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.या प्रदर्शनामध्ये जगातील सर्वात मोठे शेतकरी आंदोलन म्हणून ओळख असणाऱ्या चरीकोपरच्या संपाची तपशीलवार माहिती दिली आहे. या संपामुळेच देशात कुळ कायदा लागू झाला. चिरनेरचा जंगल सत्याग्रह, जासई दास्तान फाट्यावरील रक्तरंजित आंदोलन याचा तपशील या प्रदर्शनामध्ये देण्यात आला आहे. आगरी समाजाचे पहिले आमदार व शेतकरीनेते नारायण नागू पाटील, लोकनेते दि. बा. पाटील यांच्यासह भूमिपुत्रांच्या आंदोलनास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सहकार्याची माहितीही देण्यात आली आहे. आगरी कोळी हाच मुंबईतील मूळ भूमिपुत्र. कुळ कायदा, साडेबारा टक्के योजना, विमानतळबाधितांचे आंदोलन व इतर सर्व आंदोलनांच्या माध्यमातून भूमिपुत्रांचा स्वाभीमानी बाणा देशाने पाहिला. देशभरातील प्रकल्पबाधितांच्या आंदोलनाची दिशा भूमिपुत्रांनी बदलली असून, देशाच्या विदेश व्यापारापासून मिठाच्या शोधामध्ये भूमिपुत्रांचेच योगदान असल्याची माहिती प्रदर्शनामधून दिली आहे. प्रत्येक भूमिपुत्रांना व शहरातील प्रत्येक नागरिकांना आगरी कोळी समाजाची यशोगाथा माहीत व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याची माहिती आयोजक नामदेव भगत यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)सांस्कृतिक-ऐतिहासिक पार्श्वभूमी आगरी कोळी समाजाला ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. चरीकोपरचा संप ते गरजेपोटी बांधलेल्या घरांपर्यंतचा लढा असा चळवळीचा भव्य इतिहास लाभला आहे. कोळीगीतांच्या तालावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही ठेका धरण्यास भाग पाडले होते. स्वातंत्र्य चळवळीमध्येही भूमिपुत्रांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावात भजन, कीर्तनाचे सूर वर्षभर ऐकायला मिळत असतात. भूमिपुत्रांनी देशाला मिठाची देणगी दिली असून, हा उदात्त इतिहास व समाजाची संघर्षमय यशोगाथा प्रत्येक घरामध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आयोजक नामदेव भगत यांनी दिली.