शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मक्लेश’मध्ये उच्चशिक्षित तरुणांचाही सहभाग

By admin | Updated: May 29, 2017 06:41 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश आंदोलनामध्ये शेतकऱ्यांसोबत उच्चशिक्षित तरुणही सहभागी झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश आंदोलनामध्ये शेतकऱ्यांसोबत उच्चशिक्षित तरुणही सहभागी झाले आहेत. टॅब व स्मार्ट फोनच्या आधारे ही तरुणाई आंदोलनाचा प्रत्येक क्षण टिपून राज्यभरातील शेतकरी व कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवत आहे. तरुणाईसोबत कोल्हापूरमधील डॉक्टरांचे पथकही आंदोलनात सहभागी झाले असून मोफत उपचार देवून शेतकऱ्यांना लढण्याचे बळ देत आहेत. आत्मक्लेश आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाच हजार शेतकरी रविवारी दुपारी वाशीतील जागृतेश्वर मंदिरामध्ये क्षणभर विश्रांतीसाठी थांबले. नवी मुंबईकरांनी दिलेली भाजी भाकरी खावून पुन्हा विधानभवनाकडे रवाना झाले. आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची व सुशिक्षित तरुणांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली आहे. हर्षद पाटील हा शिरोळमधील अभियंता असलेला तरुण त्याचे वडील व भावासोबत आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आग्रहीपणे तो मांडत असून आपल्या ज्ञानाचा उपयोग चळवळीसाठी करू लागला आहे. टॅब व स्मार्ट फोनचा वापर करून आंदोलनातील प्रत्येक घटनेचे छायाचित्र टिपत असून तो राज्यभर पसरलेल्या स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत आहे. राजू शेट्टी यांची खालावलेली प्रकृती यापासून रॅलीतील प्रत्येक घडामोड काही क्षणात राज्यभर पोहचवत आहे. त्याच्याबरोबर इतरही अनेक तरुण त्यांच्यापरीने योगदान देत आहेत.तीव्र उकाड्यामुळे आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी व खासदार राजू शेट्टी यांचीही प्रकृती खालावू लागली आहे. शेट्टी यांच्या पायाला फोडी आल्या आहेत. त्यांना चालण्यासही त्रास होत आहे. रक्तदाब कमी जास्त होवू लागला आहे. गुडघेदुखीनेही त्रस्त आहेत. त्यांची दिवसातून तीन वेळा वैद्यकीय तपासणी करावी लागत आहे. औषधांसोबत लिंबू पाणी व इतर रस दिला जात आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. याशिवाय आंदोलक शेतकऱ्यांवरही मोफत उपचार केले जात आहेत. नवी मुंबईकरांनी केले स्वागत आत्मक्लेश आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे नवी मुंबईकरांनीही स्वागत केले. जिल्हा काँगे्रस अध्यक्ष दशरथ भगत, युवक काँगे्रसचे निशांत भगत यांनी जागृतेश्वर मंदिरामध्ये आंदोलकांची भेट घेतली. सर्वांना जेवणाची व क्षणभर विश्रांती घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूरमधील नागरिकांनीही शेतकऱ्यांची व शेट्टी यांची भेट घेवून लढ्यास पाठिंबा दिला. जयसिंगपूर मेडिकल ट्रस्टच्यावतीने आत्मक्लेश आंदोलनातील सहभागी शेतकरी व राजू शेट्टी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोज दोन डॉक्टरांचे पथक पाठविले जात आहे. शेतकऱ्यांची सेवा करण्याच्या हेतूने सर्व जण नि:स्वार्थपणे सहभागी होत आहेत. स्वाभिमानीच्या इतर ठिकाणच्या आंदोलनामध्येही आम्ही सहभागी होत असतो. - डॉ. जयवर्धन मरजे व डॉ. किरण पाटील स्वाभिमानीच्या प्रत्येक लढ्यात आमचे पूर्ण कुटुंब सहभागी होत असते. आत्मक्लेश आंदोलनादरम्यानची प्रत्येक घटना कॅमेऱ्यातून टिपून ते राज्यभरातील कार्यकर्ते व शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे. आपल्या पद्धतीने आंदोलनामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत. - हर्षद पाटील, मेकॅनिकल इंजिनीअर आंदोलनाच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी विविध संघटना शेतकऱ्यांची भेट घेवून मनोबल वाढवत आहेत. लोकांचे प्रेम मिळत आहे पण सरकारला मात्र जाग येत नाही. पण आम्ही मागे हटणार नसून न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवला जाईल. - बाबा सांदरे, शेतकरी