शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

तळा बँक आॅफ इंडियात पैसे जमा करण्याचा उच्चांक

By admin | Updated: November 12, 2016 06:37 IST

बँक आॅफ इंडिया शाखा तळा येथे १९८५ मध्ये सुरू करण्यात आली. गेली ३१ वर्षांत तळा शाखेत सर्वांत जास्त रक्कम गुरुवारी १० नोव्हेंबर २०१६ रोजी ग्राहकांकडून जमा करण्यात आली

तळा : बँक आॅफ इंडिया शाखा तळा येथे १९८५ मध्ये सुरू करण्यात आली. गेली ३१ वर्षांत तळा शाखेत सर्वांत जास्त रक्कम गुरुवारी १० नोव्हेंबर २०१६ रोजी ग्राहकांकडून जमा करण्यात आली. सुमारे दीड कोटी रक्कम या एकाच दिवसात बँकेत जमा केल्यामुळे ग्राहकांना कर्मचारी कमी असल्यामुळे त्रास सहन करावा लागला. बँकेचे अंतर्गत कामकाज उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती बँक व्यवस्थापक प्रसून रंजन यांनी दिली. तळा हा ग्रामीण विभाग असून भीतीपोटी ग्राहकांनी बँक उघडल्यावर बँक व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. १० नोव्हेंबरपेक्षा ११ नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच बँक आवारात ग्राहकांनी गर्दी के लीआहे. सुमारे दोन ते अडीच कोटींच्या आसपास रक्कम जमा होईल, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वत: तहसीलदार भगवान सावंत, पो. नि. संजय साबळे आणि त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. अतिशय शांततेत व संयमाने बँकेचे व्यवहार होत आहेत. परंतु सकाळपासूनच बँकेसमोर ग्रामीण भागातील नागरिक उभे आहेत. त्यांची नाष्टा जेवणाची गैरसोय झालेली ऐकिवात येत होती. भुकेपोटी काही व्याकूळ झालेले होते. पाणी देखील पिण्यासाठी रांगेतील नंबर जाईल या भीतीने कोणी जात नव्हते. बँक आॅफ इंडियाचे एटीएम गुरु वारी सकाळपासून सुरू झालेले आहे. बँकेत येताना ग्राहकांनी पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड यासारखे ओळखपत्र सोबत आणावे. तर शनिवार, रविवार देखील सहकार्य करावे, असे आवाहन व्यवस्थापक प्रसून रंजन, सहा. व्यवस्थापक उज्ज्वल मिंज, चंद्रप्रकाश शामकुवर व केदार खातू आदिंनी केले. तसेच गुरु वारी पोस्ट आॅफिसमध्ये देखील सकाळपासून पैसे जमा करण्यासाठी गर्दी झाली होती. आज सुमारे दहा लाख रुपये नागरिकांनी पोस्ट कार्यालयात जमा केले आहेत, अशी माहिती पोस्ट मास्तर श्रीकांत मेजर यांनी दिली. दैनंदिन व्यवहारापेक्षा गुरु वारी दोन्ही ठिकाणी गर्दी पहावयास मिळाली. या सर्व गोष्टींचा बाजारपेठेवर खूपच परिणाम झालेला दिसत आहे. व्यापार ४० ते ५० टक्क्यांवर आला आहे, अशी व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहे. (वार्ताहर)