शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या तरुणावर हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:18 IST

संजीव जाधव यांची माहिती; नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार

ठाणे : बीड येथे राहणाऱ्या संतोष कानडे या ३६ वर्षीय रुग्णावर अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई येथे नुकतीच यशस्वी हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी एका दानशुराचे हृदय घेण्यात आले होते.संतोष यांना झालेल्या आजारामुळे त्यांच्या हृदयाची ब्लड पम्पिंगची क्षमता कमी होते. त्यामुळे हृदयाचे मुख्य पम्पिंग चेंबर असणारी डावी झडप आकाराने वाढून कमकुवत होते. या क्लिनिकल संज्ञेला डायलेटेड कार्डिओमॅपॅथी (डीसीएम) असे म्हणतात. दोन लहान मुलांचा पिता असलेल्या या रुग्णाच्या आजाराचे नेमके निदान होण्यापूर्वी त्यांना गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून दम लागून पायºया चढताना त्रास होता. वारंवार हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत नव्हती. अखेर त्यांना अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई येथील क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.या केसमध्ये मुख्य तज्ज्ञ असणारे, हॉस्पिटलचे सीव्हीटीएस व हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी कन्सल्टंट डॉ. संजीव जाधव म्हणाले, ‘‘डायलेटेड कार्डिओमॅपॅथी हे कार्डिओमॅपॅथीचे सर्रास आढळणारे स्वरूप आहे. या विशिष्ट रुग्णाच्या बाबतीत, हृदय केवळ १७ टक्के काम करीत होते आणि त्याला तातडीने हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. रुग्णासारखाच रक्तगट असणारी ४१ वर्षीय महिला डोनर होती. तिला रस्त्यावरील अपघातामध्ये ब्रेन-डेड (कॅडव्हर डोनर) जाहीर करण्यात आले. ही हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया ६० मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी अपेक्षा आहे.’’ही हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया डॉ. संजीव जाधव यांनी केली. सीव्हीटीएस सर्जन डॉ. शांतेश कौशिक, क्रिटिकल केअरचे डॉ. गुणाधार पाधी, क्रिटिकल केअरचे डॉ. अकलेश तांडेकर, डॉ. हरिदास, डॉ. सौरभ, डॉ. सनगर, अ‍ॅनेस्थेशिया आणि कार्डिआॅलॉजिस्ट डॉ. तमीरुद्दीन धनावडे या स्पेशालिस्ट टीमने त्यांना मदत केली.(वाणिज्य प्रतिनिधी)हृदय पुनर्रोपण शस्त्रक्रिया ज्यांच्यावर करण्यात आली ते संतोष कानडे म्हणाले, ‘‘माझे हृदय निकामी झाल्यामुळे जीवनाशी संघर्ष करून मी प्रतीक्षा करीत होतो. मला नवीन जीवनदान दिल्याबद्दल मी आॅर्गन डोनर कुटुंबाचा व ट्रान्सप्लांट करणाºया टीमचा आभारी आहे.’’