शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

डेरवलीत रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: August 31, 2016 03:34 IST

तालुक्यात स्वच्छता अभियान व आपत्ती नियंत्रणावर योग्य व्यवस्थापन होत असताना डेरवलीतील रहिवासी मात्र समस्यांमुळे त्रस्त आहेत.

कळंबोली : तालुक्यात स्वच्छता अभियान व आपत्ती नियंत्रणावर योग्य व्यवस्थापन होत असताना डेरवलीतील रहिवासी मात्र समस्यांमुळे त्रस्त आहेत. याठिकाणी टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या असल्या तरी मूलभूत सुविधांअभावी रहिवासी त्रस्त आहेत. सांडपाण्याबरोेबर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची सोय नसल्याने अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. सर्वत्र दलदल पसरल्याने डासांचा प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. इमारतींच्या आवारात गुडघाभर पाणी साचल्याने येता-जाताना रहिवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत वारंवार तक्र ारी करून संबंधित प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. सिडको वसाहतीत जागा शिल्लक नसल्याने आजूबाजूच्या गावात बांधकाम व्यावसायिकांनी इमारती उभारल्या. मात्र याठिकाणी ना रस्ते, ना सांडपाण्यासाठी व्यवस्था, ना कचरा विल्हेवाटीची व्यवस्था. पावसाळी नाले तर योग्यरीत्या याठिकाणी बांधण्यात आलेलेच नाहीत.उसर्ली- डेरवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीत डेरवली गावात जवळपास पन्नास इमारती उभारण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने आराखडे मंजूर करताना योग्य नियोजन केले नाही. सिध्दिविनायक, सिध्दी, श्रेया, ओमसाईधाम, पद्मावती, सिल्व्हर, गोकूळ, ज्योतीर्लिंग, मानसी यासारख्या एकूण बारा ते तेरा अपार्टमेंटमध्ये राहणारे रहिवासी याठिकाणी घरे घेऊन पश्चाताप करीत आहेत. एकूण ११२६ सदनिका असून साडेचार हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे. पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता दीर्घकालीन व्यवस्था नाही. बाजूला अरुंद गटारे तयार केली असली तरी मान्सूनपूर्व सफाई झाली नसल्याने पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नाही. काही इमारतीच्या पार्र्किं गमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. इंजीन व सायलेन्सरमध्ये पाणी जावून वाहने बंद पडत असल्याचे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पाणी साचत असल्याने सिलिंडरची गाडी अथवा स्कूल व्हॅन सोसायटीत येत नसल्याचे येथील रहिवासी दिलीप धावत्रे सांगतात. ग्रामपंचायतीकडून प्रति सदनिका १२०० रुपये घरपट्टी आकारली जाते, मात्र तुलनेने काहीच सुविधा पुरविल्या जात नाहीत. रहिवाशांकडून वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. साचलेले पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जात असल्याने साथीचे आजार बळावले आहेत. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे सुमारे चार हजार रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात तहसीलदार दीपक आकडे यांच्याशी संपर्कसाधला असता, हा विषय गटविकास अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत असल्याने तेच याबाबत कार्यवाही करतील, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)