शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मिनीट्रेनसाठी नवी रेल्वे इंजिने हवीत

By admin | Updated: February 16, 2016 02:43 IST

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईपासून अगदी जवळ असल्याने येथे पर्यटकांची गदी असते. तसेच येथील झुकझुक गाडीची मजा लुटण्यासाठी वर्षाकाठी सात लाखांहून अधिक

माथेरान : माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईपासून अगदी जवळ असल्याने येथे पर्यटकांची गदी असते. तसेच येथील झुकझुक गाडीची मजा लुटण्यासाठी वर्षाकाठी सात लाखांहून अधिक पर्यटक आपल्या बालगोपाळांसह येत असतात. परंतु या मिनीट्रेनची इंजिने ही जुनी झालेली असल्याने नेहमीच काही ना काही कारणास्तव तांत्रिकदृष्ट्या बिघाडापाई अनियमित सेवा तसेच मध्येच घाटात बंद पडत असतात. या कामी नवीन इंजिन उपलब्ध केल्यास पर्यटकांचा प्रवास सुखकर होईल. यासाठी सहा इंजिने हवीत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मनोज खेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. माथेरानचा शोध लागून जवळपास १६० वर्षे होत आली, परंतु इथल्या स्थानिक परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. नेरळ -माथेरान रेल्वेसेवा सर आदमजी पिरभॉय या दानशूर व्यक्तीने स्वखर्चाने १९०७ मध्ये त्या वेळेस १६ लाख रु पये खर्चून सुरू केली. तेव्हापासून माथेरान खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले आहे. या ट्रेनची सफर करण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. या मिनीट्रेनची नाळ स्थानिकांसह पर्यटकांशी जुळलेली आहे. दस्तुरीपासून गावात येण्यासाठी तीन कि.मी.ची पायपीट करावी लागत होती. यासाठी राज्य शासनाने एमएमआरडीएमार्फत २००९ मध्ये अमन लॉज ते स्टेशनपर्यंत शटल सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएकडून ६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. प्रवासी वाढण्यासाठी रेल्वे इंजिन यंत्रणा सुलभ असणे गरजेचे आहे. शटलसेवेप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पात या महत्त्वपूर्ण प्रयोजनासाठी राज्य सरकारकडून तरतूद होणे आवश्यक आहे. नवीन इंजिन आल्यास इथल्या सर्वसामान्यांचा व्यवसाय पर्यटनवृद्धीमुळे कार्यक्षम होईल. त्यासाठी नवीन इंजिन देण्याची मागणी येथील स्थानिकांच्या वतीने मनोज खेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.