शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जनतेशी ‘सुसंवाद’ संपला

By admin | Updated: September 2, 2015 03:54 IST

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा नवी मुंबईतील जनतेशी संवाद तुटला आहे. पालिका निवडणुकीपूर्वी ‘सुसंवाद जनतेशी’ या नावाने जनता दरबार सुरू करण्यात आला होता

नामदेव मोरे, नवी मुंबईठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा नवी मुंबईतील जनतेशी संवाद तुटला आहे. पालिका निवडणुकीपूर्वी ‘सुसंवाद जनतेशी’ या नावाने जनता दरबार सुरू करण्यात आला होता. परंतु पहिल्याच दरबारानंतर तो बंदही करण्यात आला. खासदार राजन विचारे यांनीही अद्याप जनसंपर्क कार्यालय सुरू केलेले नाही. यामुळे मंत्री व खासदारांविषयी सामान्य नवी मुंबईकरांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. नवी मुंबई दोन दशकांपासून गणेश नाईक व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात आहे. नवी मुंबईचे राजकारण म्हणजे नाईक असे समीकरण झाले होते. निवडणूक कोणतीही असो येथील जनता नाईकांच्या पारड्यात मते टाकत होती. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी परिवर्तन केले आहे. संजीव नाईक यांच्यापेक्षा शिवसेनेच्या राजन विचारे यांना ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदार संघातून तब्बल ४६ हजार २१८ मते जास्त मिळाली. नाईकांना पराभवापेक्षा बालेकिल्ल्यातून मतदान कमी पडल्याचा जबर धक्का बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये युती तुटल्यामुळे ऐरोली मतदार संघात राष्ट्रवादीला यश मिळाले परंतु बेलापूरमध्ये गणेश नाईक यांनाच पराभवास सामोरे जावे लागले. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ही नवी मुंबईकरांनी युतीला कौल दिला. शिवसेनेचे १७ वरून ३८ व भाजपाचा १ नगरसेवकाचे ६ झाले. सेनेमध्ये अंतर्गत भांडण झाले नसते तर महापालिकेमध्येही परिवर्तन झाले असते. शहरवासीयांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला परंतु पालकमंत्री व खासदार यांनी मात्र सामान्य जनतेशी संपर्कच तोडून टाकला आहे. सामान्य नागरिकांना दोघांशीही संपर्क साधता येत नाही. खासदारांनी ठाणे व मीरा-भार्इंदरमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू केले परंतु नवी मुंबईमध्ये मागणी करूनही कार्यालय सुरू केलेले नाही. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी सलग दहा वर्षे ठाणे, नवी मुंबईमध्ये जनता दरबार आयोजित केला होता. त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला स्वत:चे प्रश्न मांडता येत होते. पोलीस, महापालिका व इतर सर्व शासकीय विभागांशी संबंधित नागरिकांची कामे तत्काळ होत होती. आजारी व्यक्तीला उपचारासाठी तर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतही मिळत होती. परंतु एकनाथ शिंदे पालकमंत्री झाल्यापासून जनता दरबार बंद झाला. सामान्य नागरिकांना पालकमंत्र्यांना भेटणे मुश्कील झाले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी पालकमंत्र्यांनी ‘सुसंवाद जनतेशी’ या नावाने जनता दरबार आयोजित करण्याचे निश्चित केले. १३ मार्चला पहिला सुसंवाद कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पाडला. चार वाजताच्या या दरबाराला पालकमंत्री तब्बल चार तास उशिरा आले. फक्त १५ जणांची निवेदने स्वीकारून दरबार गुंडाळण्यात आला. तेव्हापासून जनतेशी सुसंवाद बंद करण्यात आला आहे. याविषयी शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.