शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत दोन इमारतींवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:19 IST

चोख पोलीस बंदोबस्त : महापालिका, सिडकोची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : परवानगी न घेता अनधिकृतपणे घणसोली येथे बांधकाम सुरू असलेल्या दोन आरसीसी इमारतींवर सिडको आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने मंगळवारी संयुक्त कारवाई करून बांधकाम निष्कासित केले.घणसोली गावातील अर्जुनवाडी परिसरात सोमवारी महापालिकेच्या विभागाने कारवाई केली होती. या कारवाईला २४ तास उलटूनही गेले नाही तोच मंगळवारी सिडको आणि महापालिकेने पोलीस बंदोबस्तात येथील बिल्डर विजय अहिरे आणि कैलास प्रधान यांच्यासह अन्य एका इमारतींवर कारवाई केली. सिडको आणि महापालिकेने वारंवार सूचना देऊनही बांधकाम सुरूच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि सिडकोचे अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक किशन जावळे यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या प्रभारी नियंत्रक सुमन कोळगे, सहायक नियंत्रक अमोल देशमुख, महापालिकेच्या वतीने घणसोली विभागाचे सहायक आयुक्त महेंद्रसिंग ठोके आणि कोपरखैरणे विभागाचे सहायक आयुक्त अशोक मढवी यांनी ही धडक कारवाई केली. कारवाईसाठी ४५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, १५ लेबर, ९ कॉम्प्रेसर, ब्रेकर मशिनरी, १२ सुरक्षारक्षक, दोन ट्रक असा फौजफाटा होता.घणसोली, तळवली, गोठीवली आणि रबाळे परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.