शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेडच्या बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: March 4, 2016 01:56 IST

सीआरझेडच्या बांधकामांवर गुरुवारी तिसऱ्या दिवशीही जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर फिरला. रेवदंडा आणि नागाव येथील चार बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

अलिबाग : सीआरझेडच्या बांधकामांवर गुरुवारी तिसऱ्या दिवशीही जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर फिरला. रेवदंडा आणि नागाव येथील चार बांधकामांवर कारवाई करण्यात आली. पैकी प्रमिला मंचाड आणि उदयकुमार जसाणे यांची बांधकामे पाडण्यात आली, तर मेहरनोज हिरामाणेक आणि राजेश गायकवाड यांनी अलिबागच्या न्यायालयातून स्थगिती आणल्याने त्यांची बांधकामे वाचली आहेत.अलिबाग तालुक्यात समुद्र किनारी सीआरझेडचे उल्लंघन करुन टोलजंग बंगले बांधणाऱ्यांविरोधात मंगळवारी जिल्हा प्रशासनाने बुलडोझर चालविण्यास सुरुवात केली आहे. २८ बांधकामे प्रशासनाच्या हिटलिस्टवर आहेत. तालुक्यातील ८५ प्रकरणातील ६९ बांधकामांबाबत गुन्हा दाखल असून पैकी ५६ जणांना १६ फेब्रुवारीला जिल्हा प्रशासनाने कारवाईची नोटीस दिली होती. अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ हे गुरु वारी सकाळीच फौजफाट्यासह रेवदंडा आणि नागाव येथे गेले. त्यांनी मंचाड यांच्या मालकीचे सुमारे ४५० स्क्वेअर फुटाचे बांधकाम पाडले. त्याच परिसरात असणाऱ्या माणेक आणि गायकवाड यांचेही बांधकाम पाडण्यात येणार होते मात्र त्यांनी अलिबागच्या न्यायालयातून स्थगिती आणल्याने त्यांची बांधकामे तोडण्याचे स्थगित केले, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ यांनी लोकमतशी बोलताना दिली. १नांदगाव : मुरुड तहसील कार्यालयाचे तहसीलदार उमेश पाटील यांनी गुरु वारी बेधडक कार्यवाही करीत महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ अन्वये व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ (सीआरझेड) या कायद्याच्या आधारे मुरुड तालुक्यातील दांडा येथील विरुष कोठारी, बारशिव येथील पुतली वजीर, संजय ब्रोगोडिया या तिघांचे बंगले बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्याने सर्व बंगलेधारकांचे धाबे दणाणले आहेत. २तहसीलदारांसह रेवदंडा व मुरुड पोलीस उपनिरीक्षक, सार्वजनिक बांधकाम कर्मचारी, वीज मंडळ अधिकारी असा फौजफाटा उपस्थित होता. मुरुड तालुक्यात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन १४२ जणांनी अनधिकृत बंगले बांधले आहेत. त्यापैकी ४४ जणांचे बंगले हे स्थानिक लोकांचे आहेत. ३स्थानिकांवर कार्यवाही होणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले. सीआरझेड अंतर्गत यांना वगळण्यात आले आहे. ७३ बंगले धारकांनी जिल्हा कोर्टाकडून तात्पुरता स्थगिती आदेश प्राप्त केला आहे. त्यामुळे यांच्यावर सध्या तरी कार्यवाही करणार नसल्याचे तहसीलदार पाटील म्हणाले.