शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अध्यापक महाविद्यालयाला गवताचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:32 IST

प्राण्यांमुळे भीती वाढली

कळंबोली : पनवेल बस स्थानकाजवळील शासकीय अध्यापक महाविद्यालय परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बाजूला असलेल्या शिवाजीनगर झोपडपट्टीसह परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पनवेल बस स्थानकाजवळ असलेल्या अध्यापक महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. तर संरक्षण भिंतींवर वेलींनी कब्जा केला आहे. कोरोना काळात शासकीय अध्यापक महाविद्यालय बंद असल्याने परिसराच्या साफसफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे गवताचे प्रमाण वाढले आहे. अध्यापक विद्यालय फलकसुद्धा वेलीने वेढलेला आहे. त्यामुळे बाजूच्या परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. दिवसभर उन्हाच्या गर्मीमुळे साप रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. विंचू त्याचबरोबर इतर दंश करणारे प्राणी परिसरात वावरताना दिसत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनासुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गवत वाढल्याने झोपडीधारक या गवतात कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरून चालताना नागरिकांना नाक मुठीत धरावे लागत आहे. परिसरात लाईटची व्यवस्था नसल्याने रात्री रहिवाशांना त्रास होत आहे. त्याकरिता अध्यापक विद्यालयातील परिसराची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.संरक्षण भिंतीवरील तारा तुटलेल्या अवस्थेतमहाविद्यालयास संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. त्यावरील तारेचे कुंपण तुटलेल्या अवस्थेत असल्याने कुत्र्यांचे वास्तव्य वाढले आहे. तर कचरा भिंतीवरून गवतात फेकला जात आहे. रात्री लाईटची व्यवस्था नसल्याने सरपटणारे प्राणी दिसून येत नाहीत.