शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने महापौरांचा निर्णय केला विखंडित

By admin | Updated: February 20, 2016 03:05 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत आठवडाभरात निर्णय घ्या, अन्यथा आम्ही आदेश देऊ, असे मुंबई उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर मुदत संपायच्या एक

धीरज परब ,  मीरा रोडमीरा-भार्इंदर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत आठवडाभरात निर्णय घ्या, अन्यथा आम्ही आदेश देऊ, असे मुंबई उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर मुदत संपायच्या एक दिवस आधी शासनाने महापौरांचा निर्णय विखंडित केला आहे. राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता होणार असताना भाजपाच्या महापौरांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद बहाल केले. तर, भाजपा शासनाने महापौरांचा निर्णय विखंडित करण्यास वेळकाढूपणा केल्याने गेले ९ महिने पालिका विरोधी पक्षनेत्याशिवाय आहे. फेब्रुवारी २०१५मध्ये भाजपाच्या गीता जैन महापौर झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला डावलून काँग्रेसचे प्रमोद सामंत यांना विरोधी पक्षनेते जाहीर केले होते. राष्ट्रवादीचे गटनेते बर्नड डिमेलो यांनी दुसऱ्याच दिवशी महापौर, आयुक्त व नगरविकास विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर आयुक्त अच्युत हांगे यांनी शासनास पत्र दिले. नगरविकास विभागाने तब्बल दोन महिन्यांनंतर महापौरांचा निर्णय बेकायदेशीर असल्याने ४५१(१)नुसार तो निलंबित करून महापौरांचा खुलासा मागवला होता. महापौरांनी शासनाला विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात २००२चा रोहिदास पाटील विरुद्ध मायरा मेंडोन्सा दाव्याचा हवाला दिला. मात्र, त्यानंतर झालेले निर्णय व शासनपत्रास त्यांनी सोईस्कर बगल दिली. पालिका व शासनात सत्ताधारी भाजपा राजकीय हेतूने वेळकाढूपणा करत असल्याने डिमेलो यांनी जुलैमध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आॅगस्टमध्ये आयुक्तांनी महापौरांच्या निर्णयाविरुद्ध अहवाल देऊनही शासनाकडून स्पष्ट निर्णय घेण्यास टोलवाटोलवी सुरू होती. न्यायाधीश अभय ओक व सी.व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने शासनाची कानउघाडणी करून निर्णय निलंबित केल्यानंतर तो विखंडित करण्याचा निर्णय वेळेत घेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आठवडाभरात निर्णय घ्या, अन्यथा आम्ही आदेश देऊ, असे खडसावले. डिमेलो यांच्या वतीने अ‍ॅड. दुर्गाप्रसाद सबनीस यांनी बाजू मांडली.