शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा अपहार करूनही ठणठण गोपाळ !

By admin | Updated: February 17, 2016 02:25 IST

कोट्यवधींचा अपहार करूनही ठणठण गोपाळ अशी अवस्था वाशी पोलिसांनी अटक केलेल्या कपिल राजपूत याची झाली आहे.

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईकोट्यवधींचा अपहार करूनही ठणठण गोपाळ अशी अवस्था वाशी पोलिसांनी अटक केलेल्या कपिल राजपूत याची झाली आहे. राजपूतने देशभरात अनेकांना फसवलेले असल्याने पोलिसांकडून त्याच्या अटकेचा आॅल इंडिया वायरलेस मेसेज करण्यात आला आहे.द्वारका मिल्क कंपनीत गुंतवणूक व कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या कपिल राजपूत याच्यासह पाच जणांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांसह विविध बँकांची त्यांनी ३०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी राज्यात मुंबई, नवी मुंबई, नगर, फलटण या ठिकाणांसह राज्याबाहेर देखील अनेक ठिकाणी त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. द्वारका मिल्क, द्वारका अ‍ॅग्रो, समर्पण फार्म, द्वारका फूड, द्वारका रिटेल बझार व इतर २४ हून अधिक कंपन्यांचा तो संचालक होता. या कंपन्यांमध्ये मुख्य पदावर मर्जीतल्या व्यक्तींना घेऊन कंपन्यांची कागदोपत्री कोट्यवधींची उलाढाल दाखवली जायची. त्याद्वारे नफ्याचे आमिष दाखवून अनेकांकडून आर्थिक गुंतवणूक करून घेतली होती. त्यापैकी काही कंपन्या बँकेच्या कर्जावरदेखील उभ्या केल्या होत्या. याचदरम्यान सन २०११ साली वाशी येथे द्वारका मिल्कचे उद्घाटन तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करून त्याने स्वत:ची राजकीय कुवत मोठी असल्याचे भासवले. तसेच काही बँकांमध्येही स्वत:ची ओळख निर्माण करून कंपन्यांच्या नावे कोट्यवधींचे कर्जही घेतले. तर ओळखीतून कर्ज मिळवून देण्याचे अनेकांना आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र त्यांना मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम तो स्वत: हडप करायचा. अशाच प्रकारे मालाडचे सुभ्रतो दत्ता यांना वाशीच्या पंजाब अँड नॅशनल बँकेतून मंजूर झालेले साडेसहा कोटी रुपये कपिल राजपूत याने सहकाऱ्यांच्या मदतीने स्वत:च्या बँक खात्यात वळवले होते. यामध्ये सदर बँकेचा तत्कालीन डेप्युटी जनरल मॅनेजर राजेश्वर गोयल याचाही सहभाग आढळल्याने वाशी पोलिसांनी त्यालाही दिल्लीतून अटक केली आहे. या प्रकरणातीत बँकेचा पिच्छा सोडवण्यासाठी सुभ्रतो यांना मुंबईचे घरही विकावे लागले आहे.