शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

जीवन विद्या मिशनचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2016 02:36 IST

नगरपालिका आणि ‘लोकमत’ यांच्या वतीने जीवन विद्या मिशन परिवाराचा गौरव सन्मान रविवारी करण्यात येणार आहे. पनवेल येथील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर

पनवेल : नगरपालिका आणि ‘लोकमत’ यांच्या वतीने जीवन विद्या मिशन परिवाराचा गौरव सन्मान रविवारी करण्यात येणार आहे. पनवेल येथील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर रविवारी सायंकाळी ६ वाजता ‘लोकमत’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पनवेल, रायगड, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्या मिशन परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.समाजप्रबोधनाच्या या कार्याला एकूण ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. सद्गुरू वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर प्रल्हाद पै यांनी जीवन विद्या मिशनच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजप्रबोधनाचे काम सुरू आहेच, त्याचबरोबर कर्जत येथे जीवन विद्या ज्ञानपीठ आणि कामोठे वसाहतीत जीवन विद्या ज्ञानसाधना केंद्र उभारण्यात आले आहे. गर्भसंस्कार, विद्यार्थी कोर्स, कौटुंबिक सौख्य, स्वानंदयोग यासारखे सत्कार्य प्रल्हाद पै यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांकरिता उत्कर्ष एक प्रवास हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये यशस्वी होण्याकरिता माइंड मॅनेजमेंट ही संकल्पना प्रल्हाद पै यांनी मांडली. या कार्याबद्दल त्यांना सावली फाउंडेशन मुंबईच्या वतीने सावली शांतीरत्न पुरस्कार तसेच धृवतारे सन्मान अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पनवेल नगरपालिका आणि ‘लोकमत’च्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित, विरोधी पक्षनेते संदीप पाटील, गटनेते अनिल भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, महिला व बालकल्याण सभापती सीताताई पाटील, शिवसेनेचे पक्षप्रतोद रमेश गुडेकर, नगरसेवक शिवदास कांबळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रल्हाद पै उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)