शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

एसटी महामंडाळाला दिलेल्या जागेवर ट्रक टर्मिनलचा घाट; स्थानिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:25 IST

स्थानिकांचा विरोध : आवास योजनेच्या घरांसाठी सिडकोचे नियोजन

कमलाकर कांबळेनवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून वाशी ट्रक टर्मिनलच्या जागेवर गृहप्रकल्प उभारला जात आहे. यापार्श्वभूमीवर ट्रक टर्मिनल तात्पुरत्या स्वरूपात वाशी आणि तुर्भे येथील एसटी महामंडळाला डेपोसाठी दिलेल्या जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्याची प्रक्रियासुध्दा सुरू करण्यात आली आहे. परंतु स्थानिक रहिवाशांकडून विरोध होत आहे. त्यामुळे  सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे. 

सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एपीएमसीच्या प्रशस्त ट्रक टर्मिनलवर घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाहीसुध्दा सुरू करण्यात आली आहे. परंतु विविध स्तरातून या प्रकल्पाला विरोध होत आहे. विशेषत: एपीएमसी प्रशासनानेसुध्दा सिडकोच्या या प्रकल्पाला विरोध केला असून, थेट न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे सिडकोने सर्व विरोध धुडाकवून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. सध्या ट्रक टर्मिनलचा अर्धा भाग पत्रे ठोकून बंदिस्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कामासाठी ट्रक टर्मिनल अन्यत्र स्थलांतरित करण्याची योजना आहे. त्यानुसार तुर्भे सेक्टर २० आणि वाशी सेक्टर २६ येथील एसटी महामंडळाला डेपोसाठी दिलेल्या जागेवर  ट्रक टर्मिनल हलविण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. 

सिडकोने एसटी महामंडळाला नवी मुंबईत डेपो उभारण्यासाठी तुर्भे सेक्टर २० आणि वाशी सेक्टर २६ येथे अनुक्रमे १५०५३ चौरस मीटर व १६६६२ चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूखंड दिले आहेत. परंतु तीस वर्षे उलटून गेले तरी एसटी महामंडळाकडून या जागेचा वापर केला गेला नाही. त्यामुळे सिडकोने अनेकदा नोटीस बजावल्या आहेत.  परंतु एसटी महामंडळाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

परिणामी हे दोन्ही भूखंड परत घेण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिकडेच एक बैठक पार पडल्याचे समजते.  या बैठकीला सिडको, राज्य परिवहन महामंडळ तसेच राज्य सरकारमधील संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार  एसटी महामंडळाला डेपोसाठी दिलेल्या दोन्ही जागेचा तात्पुरत्या स्वरूपात ट्रक टर्मिनल म्हणून वापर करण्याचे सिडकोने निश्चित केले आहे.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई