शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीतील आगाराला निवडणुकीनंतरचा मुहूर्त

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

महापालिकेच्या वतीने घणसोली येथे साकारत असलेल्या आदर्श आगाराचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. कामाची मुदत संपत आल्याने ठेकेदाराकडून उर्वरित कामे शीघ्रगतीने सुरू

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने घणसोली येथे साकारत असलेल्या आदर्श आगाराचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. कामाची मुदत संपत आल्याने ठेकेदाराकडून उर्वरित कामे शीघ्रगतीने सुरू आहेत. तर दिघ्यातील पोटनिवडणुकीनंतर या आदर्श आगाराच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता आहे.घणसोली सेक्टर १५ येथे महापालिकेच्या वतीने एनएमएमटीसाठी आगार उभारणीचे काम सुरू आहे. सुमारे ९.५ एकर जागेत डिसेंबर २०१४ पासून आगाराचे बांधकाम सुरू असून ठेकेदारास मार्च २०१६ पर्यंतची मुदत होती. त्यानुसार १८ महिन्यांचा निश्चित कालावधी संपल्याने आगाराची उर्वरित कामे उरकण्यावर ठेकेदाराकडून भर देण्यात आला आहे. येत्या १० ते १५ दिवसांत हा आगार वापरासाठी सज्ज होईल, असा परिवहन प्रशासनाचा विश्वास आहे. घणसोलीचे हे आगार एनएमएमटीच्या इतर दोन आगारांपेक्षा आदर्श बनवण्याचा प्रयत्न परिवहनने केलेला आहे. याकरिता तुर्भे व आसूडगाव आगारात जाणवलेल्या त्रुटी घणसोली आगारात भरून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. बसच्या दुरुस्तीसह धुण्याची अद्ययावत यंत्रणा त्या ठिकाणी बसवली जाणार आहे. परिवहनच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या बस या आगारातून शहरातील विविध मार्गांवर सोडल्या जाणार आहेत.परंतु हा आदर्श आगार खासगी ठेकेदाराच्या ताब्यात जाण्याची देखील शक्यता आहे. महापालिकेने नुकताच परिवहनच्या गाड्या खासगी ठेकेदारामार्फत चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याकरिता सात वर्षांच्या कालावधीसाठी ठेकेदाराची निवड केली आहे. परिवहनच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या १८५ गाड्यांचे खासगीकरण होणार आहे.आगाराचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जातील. पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. ती संपताच उद्घाटन केले जाईल- साबू डॅनिअल, परिवहन सभापती