शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सन्मित्र मंडळाचा गणेशोत्सव पर्यावरणस्नेही

By admin | Updated: September 7, 2016 03:03 IST

लोकमान्य टिळकांनी सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याच आवाहनास अनुसरून अलिबाग शहरातील

जयंत धुळप, अलिबागलोकमान्य टिळकांनी सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याच आवाहनास अनुसरून अलिबाग शहरातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ १९६२ मध्ये सन्मित्र मंडळ या मंडळाने रोवली. तेव्हापासून हिंदू-मुस्लीम एकात्मतेची सुरू झालेली ही अनोखी परंपरा यंदा ५४ व्या वर्षात पोहोचली आहे. यंदा मंडळाच्या सदस्यांनी श्रींची अत्यंत आकर्षक मूर्ती फायबरची बनवून घेवून, यंदापासून केवळ पूजेच्या छोट्या मूर्तीचे विसर्जन होईल आणि फायबरची गणेशमूर्ती पुढील गणेशोत्सवाकरिता सांभाळून ठेवून, पर्यावरणाच्या ऱ्हासावर यातून मात करुन यंदापासून पर्यावरणस्नेही सार्वजनिक गणेशोत्सव करण्यात येत असल्याची माहिती अलिबागचे नगराध्यक्ष आणि सन्मित्र मंडळ, भाजीमार्केट, अलिबाग या मंडळाचे प्रशांत नाईक यांनी दिली आहे.५४ वर्षांपूर्वी अलिबाग भाजीमार्केटमधील हिंदू, मुस्लीम, जैन, मारवाडी अशा सर्वधर्मीय तत्कालीन तरुण व्यापारी मित्रांनी एकत्र येवून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुळातच जातीय सलोख्याचे तत्कालीन गाव आणि आताचे शहर असणाऱ्या अलिबागमधील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षस्थान मुस्लीम समाजातील परंतु संपूर्ण अलिबागकरांना आदराचे असणारे सामाजिक व गांधावादी कार्यकर्ते पापाभाई पठाण यांच्याकडे सुपूर्द करुन हिंदू-मुस्लीम एकात्मतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अलिबागकरांनी ५४ वर्षांपूर्वी उभ्या महाराष्ट्रासमोर ठेवल्याने, या सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत सर्वांनाच मोठे औत्सुक्य असते. आपल्या ज्येष्ठांच्या पिढीने हिंदू-मुस्लीम एकात्मतेचा हा सार्वजनिक गणेशोत्सव त्यांच्या पुढच्या पिढीकडे सुपूर्द केला. त्या पिढीनेही एकात्मतेची परंपरा अबाधित राखून तो आता आमच्या पिढीकडे सुपूर्द केला असल्याचे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अश्विन लालन यांनी सांगितले.