शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातही ठकसेनांच्या टोळ्या सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 01:06 IST

नागरिकांना लाखोंचा गंडा; नोकरीसह विविध आमिषे दाखवून फसवणूक

- नामदेव मोरे नवी मुुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटातच नवीन नोकरी शोधण्याची वेळ अनेकांवर आली असून अशा तरुणांना फसवणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. नोकरी, फ्रँचायजीसह विविध प्रकारची आमिषे दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला जात असून अशा ठकसेनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.ऐरोली सेक्टर ८ मध्ये राहणाºया तरुणीने आॅस्ट्रेलियामधून बायोटेकमध्ये मास्टर्स पदवी मिळविली आहे. फेब्रुवारीमध्ये ती भारतात परत आली असून ‘नोकरी डॉट कॉम’वर नोकरीसाठी अर्ज केला होता. एका विदेशी कंपनीच्या नावाने ठकसेनांनी तिच्याशी संपर्क साधला व विविध कारणांनी तिच्याकडून ५ लाख ७९ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. कोपरखैरणेमधील एका तरुणालाही अशाच प्रकारे युनायटेड किंगडममध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार होऊ लागल्या आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरही ठकसेनांच्या कारवाया सुरूच आहेत. आॅनलाइन व्यवहार करणाºया नागरिकांचीही विविध कारणांनी फसवणूक केली जात आहे. नोकरी शोधणारे, फ्रँचायजी मिळविण्याचा प्रयत्न करणारे तर काही वेळा आॅनलाइन खरेदी करणाऱ्यांना लक्ष्य करून लुटले जात आहे. लॉकडाऊनपासून अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. चार ते पाच महिने घरात बसल्यामुळे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेक जण नवीन नोकरी मिळविण्यासाठी नोकरी डॉट कॉम किंवा इतर संकेतस्थळांवर अर्ज करीत आहेत. काही जण नवीन व्यवसाय सुरू करण्याचाही प्रयत्न करीत असून याचाच गैरफायदा फसवणूक करणारे घेत आहेत. नवी मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी वारंवार जनजागृती केली आहे. नागरिकांनी आॅनलाइन व्यवहार करताना सावधान राहावे, असे आवाहनही केले आहे. आॅनलाइन व्यवहार करताना काय काळजी घ्यावी याविषयी माहितीही वारंवार देण्यात येत आहे. परंतु यानंतरही नागरिक ठकसेनांच्या आमिषाला बळी पडून लाखो रुपयांचे नुकसान करून घेत आहेत.पावणेसहा लाखांची फसवणूकऐरोलीमधील एका युवतीला कॅनडामधील कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखविण्यात आले. ९ मार्चला व्हिजा व वर्कपरमिटसाठी ३५ हजार रुपये बँक खात्यात पाठविण्यास सांगण्यात आले. यानंतर आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध कारणांसाठी एकूण ५ लाख ७९ हजार रुपये उकळले; परंतु प्रत्यक्षात नोकरी दिलीच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या युवतीने रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.साडी खरेदी पडली महागातसीवूडमधील एक महिला महावितरणमध्ये नोकरी करीत आहे. १२ जुलैला त्यांनी माय मूड डॉट इन या साईटवर जाऊन ११९८ रुपयांना दोन साड्या खरेदी केल्या होत्या. यानंतर ठकसेनांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून डेबिट कार्डचा नंबर व इतर तपशील मिळविला व त्यांच्या बँक खात्यातून ११ वेळा ९९०९ रुपये असे एकूण १ लाख ९८९९ रुपये काढून त्यांची फसवणूक केली.नवी मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी वारंवार जनजागृती केली आहे.नागरिकांनी आॅनलाइन व्यवहार करताना सावधान राहावे, असे आवाहनही केले आहे.फ्रँचायजीचे आमिषकोपरखैरणेमध्ये राहणाºया ३१ वर्षांच्या तरुणाचा सायबर कॅफे आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने त्याने जिओमार्टची फ्रँचायजी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. २४ जुलैला त्यांना जिओमार्टमधील कर्मचारी बोलत असल्याचे सांगण्यात आले. ५ आॅगस्टपर्यंत विविध कारणांनी १ लाख २४०० रुपये वसूल करून फसवणूक करण्यात आली.यूकेमध्ये नोकरीकोपरखैरणे सेक्टर ९ मधील ३२ वर्षांच्या तरुणाला ४ जुलैला युनायटेड किंगडममध्ये रॉयल फ्री हॉस्पिटलमध्ये नोकरीचे आमिष दाखविण्यात आले. ७ जुलैपासून १७ जुलैपर्यंत वर्कपरमिट व विविध कारणांनी त्याच्याकडून ३ लाख ५ हजार रुपये उकळले व नोकरी न देता फसवणूक केली आहे.सोफा विक्रीचा फटका : सीवूड सेक्टर ५० मधीध ५२ वर्षांचे इंजिनीअर नोएडामध्ये काम करतात. लॉकडाऊनमुळे ते घरातूनच काम करीत आहेत. त्यांनी घरातील जुना सोफा व डायनिंग टेबल विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात केली होती. ठकसेनाने ७ आॅगस्टला त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातून १८ वेळा विविध रक्कम टाकून एकूण १ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केली.