शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

यंदा गणेशोत्सवात सत्तावीस ताल वाजणार

By admin | Updated: August 20, 2016 04:51 IST

मराठमोळ््या परंपरेनुसार सण-उत्सव साजरा करण्यासाठी ढोल-ताशा पथकांची साद आवश्यक आहे. डीजे संस्कृतीला मागे टाकत राज्यातील ढोल-ताशा पथकांनी मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न

- प्राची सोनवणे, नवी मुंबई

मराठमोळ््या परंपरेनुसार सण-उत्सव साजरा करण्यासाठी ढोल-ताशा पथकांची साद आवश्यक आहे. डीजे संस्कृतीला मागे टाकत राज्यातील ढोल-ताशा पथकांनी मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघे काहीच दिवस उरले असून ढोल-ताशा पथकांची जोरदार तयारी सुरु आहे. मोठमोठ्या गणेश मंडळांच्या आगमन सोहळ््याला सुरुवात झाली असून मुंबईतील ढोल-ताशा पथकांना आगमन सोहळ््याचा मान मिळाला आहे. वाद्य पूजनाने पथकाने जोरदार तयारीला सुरुवात केली असून नवी मुंबईतील उत्सव ढोल-ताशा पथकाच्या वतीने यंदा सत्तावीस ताल सादर करणार असल्याची माहिती पथक प्रमुखांनी सांगितली. पथकांमध्ये महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महिला सुरक्षेचीही तितकीच दखल घेतली जात असल्याची माहिती ढोल-ताशा पथकांनी दिली आहे. ऐरोलीतील नादगर्जा ढोल-ताशा पथकाने काहीच महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडविले. गणेशोत्सवासाठी ढोल-ताशा पथकांनी नवनवे ताल तयार केले आहेत. ढोल-ताशा पथकांच्या वेशभूषाही मराठमोळ््या पध्दतीच्या असून महिलांसाठी नऊवारी साडी आणि फेटे, पुरुषांसाठी सदरा असा आहे. नुकताच शहरातील ढोल ताशा पथकांचा वाद्यपूजन सोहळा पार पडला असून सरावाला सुरुवात झाली आहे.यंदा पथकामध्ये तरुणांबरोबरच वयोवृध्दही उत्साहाने सहभागी झाले आहेत. तरुणांना लाजविणारा उत्साह ज्येष्ठांमध्ये पहायला मिळत असल्याची माहिती पथकाच्या सदस्यांनी दिली. सरावादरम्यान नागरिकांना कसलाही त्रास होता कामा नये याची पुरेपूर दखल घेतली जाते. रहिवासी संकुलापासून दूरच्या अंतरावर सराव केला जात आहे. ढोल-ताशा पथकामध्ये चिमुरड्यांपासून ते वयोवृध्दांचा समावेश असून प्रत्येकाला प्रशिक्षण दिले जाते. ढोल-ताशाबरोबरच इतर पारंपरिक वाद्यांचाही समावेश आहे.डीजे संस्कृतीला मागे टाकणारपाश्चिमात्य डीजे संस्कृतीपेक्षा मराठी ढोल-ताशांमध्ये असलेले वेगवेगळे ताल त्याला पारंपरिक वाद्यांनी दिलेली साद याचे प्रात्यक्षिक नवी मुंबईकरांना पहायला मिळणार आहे. आगमन सोहळ््यात मराठी अस्मितेचा झेंडा फडकविणार असून मराठी संस्कृती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असल्याची माहिती पथकांच्या सदस्यांनी दिली. नोकरी करून पथकाचे नेतृत्वखारघरमधील उत्सव ढोल- ताशा पथकाचा प्रमुख आशिष बाबर याने दिलेल्या माहितीनुसार पथकातील सदस्य नोकरी करून ढोल- ताशा वाजविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. वेळात वेळ काढून न चुकता सराव केला जात आहे. या पथकात ६०हून अधिक महिलावर्गाचा समावेश असून गेल्या वर्षीच्या तुलनेत पथकातील मुलींची संख्या दुपटीने वाढल्याचे आशिषने सांगितले. यंदाचा रंगारी बदक चाळ आगमन सोहळ््याचा मान या पथकाला मिळाला आहे.