शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवजात अर्भकांच्या जीवाशी खेळ

By admin | Updated: February 17, 2017 02:21 IST

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर वसुलीचा विक्रम केला असून तब्बल ३५५ कोटी रूपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला

नामदेव मोरे / नवी मुंबईपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर वसुलीचा विक्रम केला असून तब्बल ३५५ कोटी रूपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला आहे. पुढील वर्षासाठी विक्रमी २९९९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पण पालिका रूग्णालयात एक वर्षापासून बंद असणारा एनआयसीयू विभाग सक्षम करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. नवजात अर्भकांचा मृत्यू होत असून गरीब रूग्णांची गैरसोय थांबविण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिघा झोपडपट्टीमधील प्रमिला विश्वकर्मा व भारती रावसाहेब देठे यांना काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी महापालिकेच्या वाशी रूग्णालयामध्ये नेण्यात आले. परंतु तिथे अतिदक्षता विभागात जागा नसल्याने रूग्णालयात दाखल करून घेतले नाही. दोनही महिलांना मुंबईला घेवून जात असताना वाटेतच प्रसुती होवून अर्भकाचा मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वी याच परिसरातील विजय शिंदे यांच्या पत्नीला वाशी मनपा रूग्णालयात दाखल केले आहे. रूग्णालयात एनआयसीयू विभाग बंद असल्याने नवजात अर्भकास ठाणे महापालिकेच्या कळवा रूग्णालयात ठेवण्यात आले आहे व आई वाशी रूग्णालयात उपचार घेत आहे. नवजात अर्भकांशी व गर्भवती महिलांच्या जीवाशी खेळले जात असल्याची ही पहिली घटना नाही. एक वर्षापासून हा प्रकार सुरू असुन पालिका प्रशासनाने काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत.मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर स्थायी समितीमध्ये अनेक वेळा आरोग्य विभागाच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींनी ताशेरे ओढले. एनआयसीयू विभाग बंद आहे. यामुळे नवजात रूग्णांना खाजगी रूग्णालयांमध्ये पाठवावे लागत आहे. गरिबांना हा खर्च परवडत नाही. महापालिकेने बेलापूर, नेरूळ व ऐरोली रूग्णालये सुरू करावी, एनआयसीयू युनिट वाढविण्यात यावे यासाठी पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही. स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. जगदीश गवते यांनी दिघामधील रूग्णांची उदाहरणे देवून वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. अजून किती महिला व अर्भकांना जीव गमवावा लागेल असा प्रश्न उपस्थित केला. तुर्भेमधील नगरसेविका शुभांगी पाटील यांनीही माता बाल रूग्णालय बंद आहे व प्रथम संदर्भ रूग्णालयात झोपडपट्टीमधील रूग्णांना प्रवेशच मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)आयुक्तांनी २२ वर्षांची प्रथा मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपशासन आदेशाप्रमाणे प्रत्येक वर्षी २० फेब्रुवारीपर्यंत पालिकेतील कर आकारणीला स्थायी समितीची मंजुरी आवश्यक असते. परंतु यावर्षी आयुक्तांनी अद्याप परवानगी घेतलेली नाही. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच त्याचे वाचन करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे स्थायी समिती सभापती व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे व लोकप्रतिनिधी यांच्यामधील वादाचा प्रत्यय पुन्हा अर्थसंकल्प सादर करताना शहरवासीयांना पहावयास मिळाला. स्थायी समितीमध्ये सभेसाठी येताच आयुक्तांनी सदस्यांना बुके देवून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. पण सभा सुरू होताच आयुक्तांनी अर्थसंकल्प वाचनास सुरवात केली. याला सर्व सदस्यांनी आक्षेप घेतला. सर्वप्रथम सभेमध्ये अर्थसंकल्प सादर होणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यावर आयुक्तांनी निवेदन करायचे असते. पण अर्थसंकल्प सादर न करताच निवेदन कसे काय केले जावू शकते असा आक्षेप घेण्यात आला. २२ वर्षांची प्रथा मोडीत काढली जात असल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिल्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्यात आला, परंतु आयुक्तांना निवेदन करण्याची संधी न देताच सभा संपविण्यात आली. आयुक्तांना निवेदन करू न दिल्याविषयी माहिती घेण्यासाठी सभापती शिवराम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आयुक्त सर्व संकेत व नियम डावलण्याचा प्रयत्न करत होते. वास्तविक महापालिकेच्या वार्षिक कररचनेला २० फेब्रुवारीपर्यंत मंजुरी घेणे आवश्यक असते. परंतु यावर्षीच्या करांना मंजुरीच घेण्यात आलेली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महापौरांनी केला सभापतींचा सत्कार करनिश्चिती झालेली नसताना आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. याशिवाय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच सर्व संकेत डावलून निवेदन करण्याचा प्रयत्न केला. सभापती शिवराम पाटील व इतर सदस्यांनी आयुक्तांना रोखले. यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांनी सभापती व सर्व सदस्यांचा सत्कार केला.