शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

फोरजी केबलमुळे रस्त्यांची चाळण

By admin | Updated: February 26, 2016 04:17 IST

नवीन पनवेलमध्ये खाजगी मोबाइल कंपन्यांकडून फोर-जी केबल टाकण्याकरिता रस्ते खोदण्यात आले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहनचालक त्रस्त आहेत

पनवेल : नवीन पनवेलमध्ये खाजगी मोबाइल कंपन्यांकडून फोर-जी केबल टाकण्याकरिता रस्ते खोदण्यात आले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहनचालक त्रस्त आहेत. खोदकामानंतर खड्डे योग्यरीत्या बुजवले जात नसल्याने पावसाळ्यात ते जीवघेणे ठरत आहेत. याबाबत सिडकोकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. सध्या इंटरनेटचा जमाना असून ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून फोर जी सेवा पुरविण्यास सुरूवात झाली आहे. सिडको वसाहतीत अनेक ठिकाणी फोर जीची केबल टाकण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी नवीन पनवेल, खांदा वसाहतीत केबल टाकण्यात आली. त्याकरिता कित्येक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले. मात्र ते योग्यरीत्या बुजवले जात नाहीत. अभ्युदय आणि कर्नाळा बँकेजवळ मोठमोठे खड्डे टेलिकॉम कंपन्यांकडून खोदण्यात आले आहेत. केबल टाकण्यासाठी ड्रील करून लांबच लांब खोदाई करण्यात येत आहे. वळणावर खोदकाम केल्याने दुचाकीच्या अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त खड्ड्यांतील माती रस्त्यावर उडत असल्याने वाहने घसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शिवा संकुल ते तुळशी हाईट दरम्यानच्या खोदण्यात आलेल्या रस्त्याची अवस्था वाईट आहे. तीच स्थिती बांठिया, सी.के.टी. विद्यालय परिसरात आहे. खांदा वसाहतीतील शनी मंदिर ते आसुडगाव बस डेपो या दरम्यान असलेल्या रस्त्याच्या कडेला केबल टाकण्याकरिता खड्डे खोदण्यात आले होते. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक मार्गावरही तीच गत आहे. सिडकोने या मार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)वाहिन्या टाकण्याकरिता अनामत रक्कम घेतली जाते. काम झाल्यानंतर संबंधित विभागातून आम्हाला पत्र येते. त्यानंतर निविदा काढून रस्त्यांची डागडुजी केली जाते. फोरजीचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच निविदा काढून डॅमेज भरून काढण्यात येईल.- प्रणीक मूल, कार्यकारी अभियंता, सिडको