शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: October 13, 2016 04:13 IST

नगराध्यक्षपदाच्या महिला ओबीसी उमेदवारांच्या आरक्षणाच्या घोषणेनंतर विविध पक्षातील विशेषत: इच्छुक उमेदवारांची चांगलीच पंचाईत

उरण : नगराध्यक्षपदाच्या महिला ओबीसी उमेदवारांच्या आरक्षणाच्या घोषणेनंतर विविध पक्षातील विशेषत: इच्छुक उमेदवारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. विविध पक्षांच्या इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले असले तरी आता नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारांच्या चाचपणीच्या कामात सर्वच राजकीय पक्ष गुंतले आहेत.नगराध्यक्षपद महिला ओबीसीसाठी आरक्षित असून येत्या डिसेंबर २०१६ रोजी होऊ घातलेल्या उरण नगरपरिषदेच्या ९ प्रभागाच्या १८ जागांचे आरक्षण याआधीच जाहीर करण्यात आले आहे. उरण नगर परिषदेच्या १८ जागांसाठी ९ महिला आणि ९ पुरुष असे वाटप याआधी जाहीर झाले आहे. त्यानंतर सर्वांनाच प्रतीक्षा होती ती नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची, यासाठी सेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप आदि पक्षांच्या नगराध्यपदासाठी असलेल्या काही इच्छुक उमेदवारांनी अनेक स्वप्ने रंगविली होती. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी किती कोटी खर्च करणार याचीही भाकिते विशेषत: इच्छुकांनी जाहीर केली होती. मात्र नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडीची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुक पुरुष उमेदवारांच्या मनसुब्यांवर चांगलेच पाणी फेरले गेले आहे.निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर नसली तरी आता नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी उमेदवारांची विविध पक्षांकडून चाचपणीला सुरवात केली आहे. रायगड जिल्ह्यात शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची घोषणा याआधीच केली आहे. उरणमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप यांची परिवर्तन महाआघाडीची घोषणा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. आघाडीबाबत सेना-भाजपामध्येही अद्याप संभ्रम आहे. येत्या काही दिवसात पक्षांच्या राजकीय आघाडीच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांमध्येही पक्षीय आघाडीच्या विशेषत: सेना-भाजपा आघाडीच्या घोषणेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (वार्ताहर)