शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

तरुणी पालकांच्या स्वाधीन

By admin | Updated: November 7, 2016 03:01 IST

कोकणाकडून रेल्वेने मुंबईकडे जाणारी एक २० - २२ वर्षीय तरु णी अनावधानाने कासू किंवा पेण स्थानकावर उतरून महामार्गावरून चालत कोलेटी गावात आली होती.

नागोठणे : कोकणाकडून रेल्वेने मुंबईकडे जाणारी एक २० - २२ वर्षीय तरुणी अनावधानाने कासू किंवा पेण स्थानकावर उतरून महामार्गावरून चालत कोलेटी गावात आली होती. याबाबत स्थानिकांनी बीट मार्शलला माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने कार्यवाही करीत त्या तरु णीला नागोठणे पोलीस ठाण्यात आणून दोनच दिवसात तिच्या पालकांचा शोध घेवून त्यांच्या स्वाधीन के ले.राजापूर तालुक्यातील कोदिवली गावची एक तरु णी कफ परेड येथे कामाला असून काही कामानिमित्त ती कोकणात आपल्या घरी आली होती. ही तरु णी ३१ आॅक्टोबरला कोकण रेल्वेने मुंबईकडे परतत असताना ती कासू किंवा पेण या स्थानकावर अनावधानाने उतरली होती. तरु णीचे काही अंशी मानसिक संतुलन बिघडल्याने ती पुन्हा चालत माघारी फिरली व नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलेटी गावात आली. तिने दोन दिवस या गावातच ठिय्या मांडला होता. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याचे बीटमार्शल किरण पाटील आणि आंबेतकर यांना कळविल्यानंतर त्यांनी तातडीने तेथे जावून तिची चौकशी केली. चौकशीत तरु णी असंबद्ध बरळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिला पुढील चौकशीसाठी नागोठणे पोलीस ठाण्यात आणले. तरु णीने फक्त आपले व गावचेच नाव सांगितल्याने पोलिसांनी हा धागा पकडत पो. नि. संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू केला. याबाबत राजापूर आणि कफ परेड येथील पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला असता, राजापूर तालुक्यातील कोदिवली गावातील एक तरु णी मुंबईकडे जात असताना ती बेपत्ता झाली असल्याचे स्पष्ट झाले. या तरु णीच्या नातेवाइकांना तातडीने नागोठणे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविल्यानंतर ही आपलीच मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्याने तिला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. पो. नि. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शलने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)