शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीचे माजी नगरसेवक संजय पाटील यांचे निधन

By admin | Updated: November 6, 2016 04:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे घणसोली तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय पाटील उर्फ अंकल यांचे शनिवारी पहाटे दिर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे घणसोली तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय पाटील उर्फ अंकल यांचे शनिवारी पहाटे दिर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. घणसोली येथील माजी नगरसेवक संजय पाटील यांनी राजकारण विरहीत मैत्रीचे संबंध जपले होते. त्यांच्या विनोदी व मनमिळावू स्वभावामुळे बहुतांश नवी मुंबईकरांना ते परिचित होते. विभागातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात याकरिता अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी प्रयत्न केले. सिडको व महापालिकेच्या कागदोपत्री प्रक्रियेत अडकलेल्या घणसोली विभागाच्या हस्तांतरणासाठी देखिल त्यांनी विषेश पाठपुरावा केला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच घणसोलीकरांनी उत्स्फुर्त बंद पाळला. एकूणच घणसोली गाव व कॉलनी परिसरात शोककळा पसरली होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घणसोलीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजीमंत्री गणेश नाईक, आमदार संदिप नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, विरोधीपक्ष नेते विजय चौगुले, काँग्रस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांच्यासह इतर नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)