शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात शहरातील शाळांना पाच दिवस सुटी

By admin | Updated: August 31, 2016 03:41 IST

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे ५ सप्टेंबरला आगमन होत आहे. त्यासाठी सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे.

नवी मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे ५ सप्टेंबरला आगमन होत आहे. त्यासाठी सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरातील सर्वच शाळांना पाच दिवसांची सुटी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे भेट घेऊन निवेदन सादर केले. सर्वत्र थाटामाटात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी शहरातील चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात व आपल्या गावी जातात.उत्सवाच्या काळात नवी मुंबईतील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा जाणूनबुजून परीक्षांचे आयोजन करीत असल्याची नाराजी मनविसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. येत्या ३-४ दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी शहर सचिव निखील गावडे, उपशहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, संदेश डोंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.