शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दोन दरोडेखोरांचा तरुणावर गोळीबार

By admin | Updated: February 20, 2016 02:04 IST

कर्जत तालुक्यात मागील काही दिवसात दुसऱ्यांदा गोळीबार होण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास नेरळ -कळंब रस्त्यावरील कोदिवले गावाच्या हद्दीत असलेल्या घरी

नेरळ : कर्जत तालुक्यात मागील काही दिवसात दुसऱ्यांदा गोळीबार होण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास नेरळ -कळंब रस्त्यावरील कोदिवले गावाच्या हद्दीत असलेल्या घरी दरोडा घालण्यासाठी आलेल्या दोन दरोडेखोर तरु णांनी गोळीबार केला. या गोळीबारात व्यावसायिक असलेला तरु ण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.नेरळजवळील कोदिवले येथे आकाश धुळे पत्नी आणि आईसह राहतात. त्यांची भाताची गिरणी आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी ७ वाजता गिरणी बंद करून आपल्या आईसह आकाश नेरळ येथे कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी स्वाती धुळे या एकट्याच घरी होत्या. सव्वा आठच्या सुमारास कोदिवले येथील घराचा दरवाजा कोणी तरी ठोकला. त्यावेळी स्वाती धुळे यांनी दरवाजा उघडताच तोंडाला पांढरा कपडा बांधलेले दोन तरुण घरात घुसले. माझ्या भावाचे आॅपरेशन आहे त्यासाठी पाच लाख दे असे मराठी भाषेत एक दरोडेखोर सांगत होता. तर दुसरा दरोडेखोर हा हिंदी भाषेत बोलत होता .स्वाती धुळे यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून घेत पाच लाखांची मागणी ते करत होते. त्यांच्या हातात गावठी पिस्तूल, सुरा होता. घाबरलेल्या स्वाती धुळे यांनी हुशारी दाखवत हातातील मोबाइलवरून पती आकाश धुळे यांना फोन लावला. तेव्हा त्यांनी पत्नीच्या मोबइलवरून चर्चा ऐकली. क्षणभर न थांबता आकाश धुळे यांनी घर गाठले, त्यावेळी अचानक कार आलेली पाहून त्या दरोडेखोरांनी कारवर गोळीबार करण्यास सुरु वात केली. पत्नी संकटात असल्याचे बघून आकाश धुळे हे कारमधून उतरले, तेव्हा आपला बचाव करण्यासाठी त्या दरोडेखोरांनी आकाशवर गोळीबार केला, त्यातील गोळी आकाशच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर लागली त्या दोन्ही दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.जखमी अवस्थेतील आकाश धुळे (२९) यांनी कारमधून पत्नी स्वाती यांना बरोबर घेवून नेरळ सरकारी दवाखाना गाठला. तेथे नेरळ मालेगाव येथील एका जीपमध्ये जखमी आकाश धुळे यांनी नेरळमधील डॉ. हेमंत शेवाळे यांच्या खाजगी दवाखान्यात उपचार करण्यासाठी दाखल केले. डॉ. शेवाळे यांनी प्राथमिक उपचार करून आकाश धुळे यांना नेरळ येथून बदलापूर येथील भगवती रु ग्णालय येथे पुढील उपचार करण्यासाठी पाठविले. (वार्ताहर)