शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

लॉजच्या परवानगीची फाइल नगररचना विभागाकडे

By admin | Updated: April 20, 2016 02:36 IST

तुर्भे सेक्टर २० मध्ये निवासी चाळीमध्ये लॉज सुरू करण्यास परवानगी देण्याची फाइल परवाना विभागाकडे गेली आहे. तक्रारीकडे दुर्लक्ष करून त्यांना परवानगी देण्यासाठी राजकीय व प्रशासनामधी

नवी मुंबई : तुर्भे सेक्टर २० मध्ये निवासी चाळीमध्ये लॉज सुरू करण्यास परवानगी देण्याची फाइल परवाना विभागाकडे गेली आहे. तक्रारीकडे दुर्लक्ष करून त्यांना परवानगी देण्यासाठी राजकीय व प्रशासनामधीलही काही अधिकाऱ्यांचा दबाव वाढू लागला आहे. अतिक्रमण व पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष करून नगररचना परवानगीची शिफारस करणार का, याकडे रहिवाशांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रशासनावर दबाव आणून नियमबाह्य कामे करून घेण्याची स्पर्धा शहरात सुरू झाली आहे. एखादे काम करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव वाढू लागला आहे. तुर्भे सेक्टर २० मध्ये निवासी जागेवर लॉजिंग व हॉटेल सुरू करण्यासाठीही सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. येथे बैठ्या चाळीतील घरे हॉटेलमालकांनी विकत घेऊन त्यावर सिडको व पालिकेची परवानगी घेऊन इमारत बांधली आहे. नगररचना विभागाने तळ अधिक एक मजला एवढीच परवानगी दिली असताना प्रत्यक्षात दोन मजले तयार केले आहेत. दोन्ही गल्ल्यांमधील सार्वजनिक वापराच्या जागेतही अतिक्रमण केले आहे. प्रस्तावित हॉटेल व लॉजला रहिवाशांनी तीव्र विरोध करण्यास सुरवात केली आहे. रहिवाशांचा विरोध मोडून काढण्यासाठी राजकीय व प्रशासनाकडून दबाव येवू लागला आहे. हॉटेल व लॉजच्या परवानगीसाठी संबंधित व्यावसायिकाने परवाना विभागाकडे अर्ज केला आहे. परवाना विभागाने ही फाईल नगररचना विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविली आहे. सदर ठिकाणी पार्किंगसाठी सुविधा आहे का याची विचारणा केली आहे. याशिवाय अतिक्रमणाबाबतही अभिप्राय विचारला आहे. नगररचना विभागातील काही जणांनी नियम डावलून परवानगी द्या असा सूर लावला असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. परवाना विभागाने हॉटेल मालकास परवानगी द्यावी यासाठी मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनीही फोन करण्यास सुरवात केली आहे. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी पडू नये असे आवाहन तुर्भेमधील नागरिकांनी केले आहे. जर नियमबाह्यपणे परवानगी दिली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक नगरसेविका शुभांगी पाटील यांनीही या विषयावर सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)