शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

कारंज्याचे झाले डम्पिंग ग्राउंड

By admin | Updated: September 1, 2015 04:47 IST

महापालिकेने वाशीतील शिवाजी चौकाचे सुशोभीकरण करून तीन ठिकाणी कारंजे बसविले आहेत. काही दिवसांपासून कारंजे बंदच असून रस्ता दुरुस्त करणाऱ्या

नवी मुंबई : महापालिकेने वाशीतील शिवाजी चौकाचे सुशोभीकरण करून तीन ठिकाणी कारंजे बसविले आहेत. काही दिवसांपासून कारंजे बंदच असून रस्ता दुरुस्त करणाऱ्या ठेकेदाराने दूषित पाणी व कचरा टाकण्यासाठी त्याचा वापर सुरू केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतील शिवाजी चौकाचे सुशोभीकरण केले आहे. चौकाच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारी शिल्प तयार केली आहेत. दुसऱ्या बाजूला नागरिकांना कार्यक्रम साजरे करण्यासाठी व छोटे प्रदर्शन भरविण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. चौकामध्ये तीन ठिकाणी कारंजे बसविण्यात आले आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून कारंजे बंदच आहेत. या ठिकाणी रोडवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. ठेकेदाराने रोडवरील गढूळ पाणी व कचरा उचलून कारंजामध्ये टाकण्यास सुरवात केली आहे. यामुळे कारंजे खराब झाले आहेत. गाळ कारंजासाठी बसविण्यात आलेल्या उपकरणामध्ये गेल्यामुळे त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. महापालिकेच्याच ठेकेदाराने चौकातील कारंजाचे डम्पिंग ग्राउंड बनविले आहे. चौकाचे विद्रूपीकरण केले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)