शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी मत्स्यव्यवसायाकडे वळावे

By admin | Updated: September 1, 2016 03:17 IST

मत्स्य संवर्धन हा व्यवसाय कसा फायदेशीर आहे याविषयी मार्गदर्शन काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था कार्यक्र म समन्वयक डॉ. के.एच.पुजारी यांनी केले.

रोहा : मत्स्य संवर्धन हा व्यवसाय कसा फायदेशीर आहे याविषयी मार्गदर्शन काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था कार्यक्र म समन्वयक डॉ. के.एच.पुजारी यांनी केले. शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळावे व आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले. तसेच शेतीपूरक जोडधंद्यातील गरज पटवून देताना महाराष्ट्र राज्य व रायगड जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनाचा आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्यपालनासारख्या जोडधंद्याची कास धरून आपला सर्वांगीण विकास साधणे शक्य असल्याचे सांगितले.डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अधिनस्त कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर गाव तलावातील मत्स्यसंवर्धन या विषयाचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले, यावेळी पुजारी बोलत होते. विशेषज्ञ माधव गीते यांनी आपल्या प्रास्ताविकात गाव तलावातील मत्स्य संवर्धनाचे महत्त्व विषद केले. प्रमुख पाहुणे डॉ. स्वामी यांनी कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचे महत्त्व विषद केले. डॉ. कोळी यांनी माशापासून उपपदार्थ बनविण्याचे तंत्रज्ञान मच्छीमार महिलांनी आत्मसात करून आपले जीवनमान उंचवावे असे नमूद केले. कार्यक्र माच्या पुढील तांत्रिक सत्रामध्ये प्रा. माधव गीते यांनी मत्स्य संवर्धनातील तांत्रिक बारकाव्यांसह मत्स्य संवधर्नाविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये मत्स्यसंवर्धनात वैविध्य आणण्यासाठी नवीन मत्स्य जातींचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे नमूद केले. तसेच मत्स्य संवर्धन हा व्यवसाय कसा फायदेशीर असून शेतीपूरक जोडधंद्याची सद्यस्थितीतील गरज पटवून देतानाच राजन झेमसे यांच्यासारखे शेतकरी इतरांना दिशादर्शक म्हणून ठरू शकतात असे नमूद केले. शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्यपालन, कुक्कुटपालन इ. जोडधंद्यांची कास धरून आपला सर्वांगीण विकास साधणे शक्य असल्याचे सांगितले.यानंतर शेतकरी, सरपंच महेंद्र ठाकूर यांनी राबविलेल्या गाव तलावातून घेतलेल्या पाण्याचे आरो प्रणालीद्वारे शुध्दीकरण करून सुरक्षित व आरोग्यदायी पेयजल योजना अत्यंत अल्प दरामध्ये ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. या कार्यक्र मास अलिबाग, रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्र म काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था कार्यक्र म समन्वयक डॉ. के. एच. पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली तर सहयोगी प्राध्यापक डॉ. स्वामी, डॉ. कोळी, डॉ. रेळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.