शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

एमजेपीकडून अतिरिक्त पाणी

By admin | Updated: February 29, 2016 02:03 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुनाट जलवाहिन्या बदलण्याकरिता पनवेल नगरपालिका ३० कोटींचा आर्थिक हातभार लावणार आहे

प्रशांत शेडगे, पनवेलमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुनाट जलवाहिन्या बदलण्याकरिता पनवेल नगरपालिका ३० कोटींचा आर्थिक हातभार लावणार आहे. त्या बदल्यात प्राधिकरणाकडून पनवेल शहरासाठी २० एमएलडी पाणी अतिरिक्त साठा म्हणून ठेवावे लागणार आहे. अमृत योजनेंतर्गत पालिकेला मिळणाऱ्या निधीतून हे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत.अर्थसंकल्पामध्ये सुध्दा प्रशासनाने पाण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. जलवाहिन्या बदलण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. याकरिता सिडको १४४, जेएनपीटी ४६ कोटी, त्याचबरोबर पनवेल नगरपालिका ३० कोटींचा आर्थिक सहभाग घेणार आहे. त्याबाबतचा करारनामा तयार आहे. पनवेल नगरपालिकेला अमृत योजनेंतर्गत २०१५-१६ व पुढील पाच वर्षाकरिता ५०.५० कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये ५० टक्के केंद्र शासन आणि प्रत्येकी २५ टक्के राज्य शासन व पनवेल नगरपालिकेकडून निधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रथम टप्प्यातील पाणी योजनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पैकी ३० कोटी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला २०.० द.ल.लि प्रतिदिन अतिरिक्त पाणी (आरक्षित) देण्यात येणार आहेत. याकामी पनवेल पालिकेने विहित पध्दतीने विस्तृत अहवाल अंदाजपत्रे व आराखडे एमजेपीकडे सादर केले आहेत. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर निधी प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहे. पनवेल शहराचे मालकीचे देहरंग धरण असले तरी या धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी आहे. पालिकेची २७ एमएलडीची गरज असताना उन्हाळावगळता इतर महिन्यात पालिकेला जास्तीत जास्त १२ एमएलडी पाणी धरणातून मिळते. उर्वरित तहान एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोकडून भागावी लागते. एमजेपीच्या जुनाट वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने वारंवार शटडाऊन घ्यावा लागतो. त्यावेळी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागते.