शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल स्थानकाचा विस्तार रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 23:55 IST

सिडको, मध्य रेल्वेचा संयुक्त प्रकल्प : झोपड्यांच्या पुनर्वसनाचा तिढा

कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल शहराला वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. विशेषत: पनवेल रेल्वे स्थानक विकासाच्या केंद्रस्थानी असणार आहे. ही बाब ओळखून या स्थानकाचा विस्तार करण्याचा निर्णय सिडको आणि मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यासंबंधीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. मात्र स्थानकाच्या विस्तारित क्षेत्रातील झोपड्यांचे पुनर्वसन आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे या प्रकल्पाचे काम रखडल्याचे सांगितले जात आहे.

पनवेल स्थानक मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे. कोकण मार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकात थांबतात. मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस तसेच विदर्भ, मराठवड्यात जाणाºया सर्व गाड्यांना या स्थानकात थांबा आहे. या स्थानकात एकूण सात फलाट असून, त्यापैकी चार उपनगरीय तर तीन लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आहेत. यात आणखी तीन फलाटांची वाढ करून सोयीसुविधांचा विस्तार करण्याची योजना आहे. भविष्यात या स्थानकावर ताण वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काळाची गरज म्हणून पनवेल स्थानकाचा मेकओव्हर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव मध्य रेल्वेला सादर करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या मान्यतेनंतर स्थानकाच्या विस्तारीकरणाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. सीएसएमटीच्या पार्श्वभूमीवर या स्थानकाचा विकास करण्याची योजना आहे.पनवेल स्थानक परिसरात सुमारे ८५0 झोपड्या आहेत. या झोपड्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सिडको व मध्य रेल्वेने संयुक्त अहवाल तयार केला आहे. पुनर्वसनासाठी एमएमआरडीएच्या रेंटल हाउसिंग योजनेतील घरे मिळवून देण्याची तयारी सिडकोने दर्शविली आहे. परंतु त्याचा संपूर्ण खर्च रेल्वेने उचलावा असा सिडकोचा प्रस्ताव आहे. त्यावर निर्णय होत नसल्याने स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम रखडल्याची माहिती सूत्राने दिली.सीएसएमटी-पनवेल कॉरिडोरचा प्रस्तावआंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण यंत्रणा सक्षम करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. मुंबईहून नवी मुंबई विमानतळापर्यंत कमीतकमी वेळेत पोहोचता यावे यादृष्टीने मेट्रो, रेल्वे, रस्ते व जलवाहतुकीचे जाळे विणले जात आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल स्थानकापर्यंत कॉरिडोर तयार केला जाणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून पनवेल स्थानकाचा सीएसएमटीच्या धरतीवर मेकओव्हर करण्याची योजना आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल