शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस वेवर पेट्रोलपंप चालकांची मनमानी

By admin | Updated: May 23, 2017 02:03 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एचपी पेट्रोल पंपचालकाच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक व प्रवासी सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

अंकुश मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कवावोशी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एचपी पेट्रोल पंपचालकाच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक व प्रवासी सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. पेट्रोलपंप आवारात मोबाइल वापरण्यास बंदी असते. याठिकाणी हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्यात आली आहे. याकडे संबंधित विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीनजीक असणाऱ्या एचपी पेट्रोलपंप आवारातील निशीसागर हॉटेलामध्ये गॅसवर पदार्थ तयार केले जातात. पेट्रोलपंप परिसरात कुठलाही ज्वलनशील पदार्थ हाताळू नये, असा शासनाचा नियम आहे, पण या हॉटेल व्यवस्थापनाने शासकीय नियमांना हरताळ फासला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. याशिवाय जवळच आलेल्या अलांना आॅइल कंपनी, तसेच पेट्रोलपंपावर असणाऱ्या डिझेल व पेट्रोलच्या साठवण टाक्यांमुळे एखादी ठिणगी पडली तर पेट्रोलपंपासह जवळचा पूर्ण परिसर खाक होऊ शकतो. एसटी महामंडळाने याठिकाणी थांबा दिल्याने प्रवाशांची वर्दळही वाढली आहे. पेट्रोलपंप आवारात कमी जागा असून, सुमारे ३०० च्या आसपास एसटी व खासगी बस तसेच पेट्रोलपंपावर पेट्रोल अथवा डिझेल भरण्यासाठी शेकडो वाहनांची संख्या नेहमीच दिसते. त्यामुळे कुठल्या निकषावर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी थांबा दिला, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. पेट्रोलपंप परिसरात अनेक गावे आहेत, एखादी दुर्घटना घडल्यास त्या गावांनाही झळ बसून जीवित वा वित्तहानी होऊ शकते. यासंदर्भात कोकण भवन कार्यालयातील स्फोटक नियंत्रण विभागाच्या डॉ. योगेश खरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विभागीय मुख्य कंट्रोलर अधिकारी विनोद कुमार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले, तर विनोद कुमार यांनी आपण सुटीवर असल्याचे सांगून प्रतिक्रि या देण्यास नकार दिला.