शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वह्यांच्या पुनर्वापराची मोहीम

By admin | Updated: June 26, 2017 01:44 IST

नवीन पाठ्यपुस्तक, वह्या यांच्या खरेदीने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. मात्र, अशा वेळेस गतवर्षीच्या जुन्या वह्या, पाठ्यपुस्तके मात्र रद्दीत जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवीन पाठ्यपुस्तक, वह्या यांच्या खरेदीने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. मात्र, अशा वेळेस गतवर्षीच्या जुन्या वह्या, पाठ्यपुस्तके मात्र रद्दीत जातात. यामधूनच विद्यार्थ्यांमध्ये वस्तूंचा पूर्ण वापर आणि पुनर्वापर कसा करता येऊ शकतो याकरिता नेरुळमधील एन.आर.बी एज्युकेशनल सोशल अ‍ॅण्ड कल्चरल ट्रस्टच्या शिक्षण प्रसारक माध्यमिक विद्यालयाच्या वतीने जुन्या वह्यांचा पुनर्वापर ही संकल्पना समोर आणली. पर्यावरणाच्या संवर्धनाकरिता विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलला असून, जुन्या वह्यांमधील शिल्लक कोऱ्या पानांपासून नवीन वह्या तयार केल्या आहेत.लाकडापासून कागदाची निर्मिती केली जात असून, त्याकरिता होणारा लाकडाचा वापर, वृक्षतोड, झाडांच्या संख्येतील घट, पर्यावरणाचा असमतोल अशा अनेक बाबींविषयी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. कागदनिर्मिती प्रक्रियेत रसायने, पाणी आणि ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा वेळी विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व कळावे, तसेच पर्यावरण संरक्षणाकरिता उपाय म्हणून जुन्या वह्यांचा पुनर्वापर ही संकल्पना राबविण्यात आली. या माध्यमातून विशेष कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना जुन्या वह्यांमधील शिल्लक पानांचा वापर करून नवीन वही कशी तयार करता येईल, याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत सातवी ते नववीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वत: वह्या तयार केल्या. शालेय विज्ञान मंडळाचे शेखर जगताप यांनी विद्यार्थ्यांना पुनर्वापर आणि कागदाचे महत्त्व पटवून दिले. संस्थेचे अध्यक्ष नामदेव भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जुन्या वह्याच नाही. रोजच्या जीवनातील अनेक गोष्टींचा पुनर्वापर आणि पूर्ण वापर करण्याविषयी मोलाचा सल्ला दिला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कोठेकर, शिक्षिका वंदना पाटील, प्रदीप खिस्ते, सुनील परदेशी, राजेंद्र पिंगळे, पूर्वा ठाकूर आदी उपस्थित होते.