शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्वावर मात करीत देतोय परीक्षा

By admin | Updated: March 4, 2016 01:52 IST

शारीरिक अपंगत्वावर मात करून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या नितीनची जिद्द सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे.

प्राची सोनवणे,  नवी मुंबईशारीरिक अपंगत्वावर मात करून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या नितीनची जिद्द सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे. अनेक संकटांवर मात करून शिकण्याची इच्छा असलेल्या नितीन जिगळेने अखेर दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरला आणि १ मार्चपासून सुरू झालेल्या या परीक्षेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने व्हीलचेअर बसून तो परीक्षा देत आहे. दोन्ही पाय गमावलेल्या नितीनची जिद्द अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे. कोपरखैरणे येथील जिजामाता कॉव्हेंट स्कूल या परीक्षा केंद्रावर सध्या तो परीक्षा देत आहे. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या नितीनने इयत्ता नववीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथे पूर्ण केले. त्यानंतर कुटुंबाचा आधार नसल्याने नितीनने मुंबईची वाट धरली. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने ड्रायव्हरचे काम केले. या दरम्यान झालेल्या अपघातामध्ये नितीनला दोन्ही पाय गमवावे लागले. वाशीतील ‘शरण’ पॅराप्लॅजिक सेंटरने नितीनला आश्रय दिला. त्याच्यातली जिद्द हेरून, अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी या संस्थेच्या वतीने नितीनला मदत करण्यात आली. पहिल्या पेपरच्या दिवशी थोडीशी भीती वाटली होती परंतु गुरुवारी झालेल्या हिंदी विषयाचा पेपर सोपा गेल्याचे सांगताना नितीनच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. आयुष्याची ही लढाई जिंकण्यासाठी विद्येशिवाय दुसरे शस्त्र नाही, अशा शब्दात त्याने शिक्षणाचे महत्त्व सांगितले. परीक्षा सुरु होण्याआधी महिनाभरापूर्वी नितीनचा उजवा हातही पाहिजे तसा काम करु शकत नसल्याने बोर्डाकडे त्याने लेखनिकाची मागणी केली. मात्र परीक्षेच्या काही दिवस आधी हात चांगला झाल्याने स्वत: पेपर लिहिण्याचा निर्णय नितीनने घेतला.