शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण अहवालातून ३२ उद्याने गायब

By admin | Updated: September 30, 2016 04:14 IST

पाच वर्षांपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर व पर्यावरण अहवालामध्ये शहरातील उद्यानांची संख्या १९९ असल्याचे भासविले जात होते. परंतु अद्ययावत संकेतस्थळ

- नामदेव मोरे,  नवी मुंबई पाच वर्षांपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर व पर्यावरण अहवालामध्ये शहरातील उद्यानांची संख्या १९९ असल्याचे भासविले जात होते. परंतु अद्ययावत संकेतस्थळ व पर्यावरण अहवालामध्ये ही संख्या १६७ असल्याचे स्पष्ट केले आहे. तब्बल ३२ उद्याने कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विभागनिहाय उद्यानांचा असमतोल व प्रशासनाचा अनागोंदी कारभारही उघडकीस आला आहे. सिडकोबरोबर महापालिकेनेही शहराचा विकास करताना पक्षपाती धोरण राबविल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. शहराची शिल्पकार म्हणविणारी सिडको आम्ही प्रत्येक नोडमध्ये उद्यानासाठी भूखंड आरक्षित केले असल्याचे सांगते. महापालिका आम्ही प्रत्येक नोडवासीयांसाठी चांगली उद्याने तयार केली असल्याचे वारंवार सांगत आहे. परंतु वास्तवामध्ये दोन्ही आस्थापनांनी शहरवासीयांची दिशाभूल केली आहे. महापालिका आतापर्यंत शहरात १९९ उद्याने असल्याचे सांगत होते. परंतु काही महिन्यांपासून अचानक हा आकडा १६७ करण्यात आला आहे. यामुळे ३२ उद्याने कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलाव व इतर मोकळ्या जागेवरील हिरवळही उद्यान असल्याचे भासविले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्यानांचा दर्जाही त्या परिसरातील लोकवस्तीच्या आर्थिक स्तरावर अवलंबून आहे. नेरूळ पूर्व बाजूला श्रीमंतांची वसाहत असल्याने तेथे वंडर्स पार्क, रॉक गार्डन, आर. आर. पाटील उद्यान अशी भव्य उद्याने आहेत. दुसरीकडे नेरूळ पश्चिमेला गरिबांची वस्ती असल्याने तेथील उद्यानेही कमी खर्चामध्ये व कमी जागेत विकसित केली आहेत. हीच स्थिती वाशीमध्येही आहे. वाशीमध्येही माथाडी वसाहत असलेल्या ठिकाणी चांगली उद्याने नाहीत. कोपरखैरणे हा माथाडी कामगारांची वसाहत असलेला विभाग. येथील उद्यानांची स्थिती अत्यंत बिकट आहे. सिडकोने उद्यानांसाठी अत्यंत कमी जागा ठेवली आहे. सर्वात गंभीर स्थिती तुर्भे गाव व नोडमध्ये आहे तिथे उद्यानांसाठी पुरेसी जागाच नाही. घणसोलीमध्येही फक्त ३ उद्याने असून दिघामध्ये फक्त एकच उद्यान आहे. उद्यानांचे क्षेत्रफळ पाहिले तरी पालिका व सिडकोचे पक्षपाती धोरण स्पष्ट होते. बेलापूरमधील उद्यानांचे क्षेत्रफळ २ लाख ९ हजार चौरस मीटर आहे. नेरूळमध्ये २ लाख ४३ हजार एवढे आहे. कोपरखैरणेमध्ये दाट लोकवस्ती असूनही तेथे फक्त ५० हजार चौरस मीटर क्षेत्रफळ उद्यानांनी व्यापले आहे. घणसोली व दिघा परिसरातील दहा चौरस मीटर एवढी जागाही उद्यानांसाठी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडकोही जबाबदार महापालिकेने श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये भव्य उद्याने उभारली आहेत. गरीब व मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या परिसरात कमी क्षेत्रफळाची उद्याने तयार केली आहेत. यासाठी फक्त महापालिकाच जबाबदार नसून सिडकोने भूखंड आरक्षित करताना योग्य नियोजन केले नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. तुर्भे, नेरूळ पश्चिम, वाशी माथाडी वसाहत, कोपरखैरणे माथाडी वसाहत व गावठाण परिसरात उद्यानांसाठी पुरेसे भूखंड ठेवलेले नाहीत. बॅकलॉग कसा दूर होणार?महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उद्यानांचा विभागनिहाय राहिलेला बॅकलॉग भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रत्यक्षात तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली व दिघा परिसरात उद्यानांची संख्या नगण्य आहे. भविष्यात जागा उपलब्ध होण्याची शक्यताही कमी आहे. अशा स्थितीमध्ये बॅकलॉग कसा भरून निघणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.