शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल नगरपालिकेत निरोपाचे वातावरण

By admin | Updated: September 30, 2016 03:54 IST

रायगड जिल्ह्यातील सर्वात जुन्या पनवेल नगरपालिकेचा शुक्रवार अखेरचा दिवस असणार आहे. शनिवारपासून नगराध्यक्षा आणि नगरसेवकांच्या नावापुढे माजी हे पद लागणार आहे

- नितीन देशमुख,  पनवेलरायगड जिल्ह्यातील सर्वात जुन्या पनवेल नगरपालिकेचा शुक्रवार अखेरचा दिवस असणार आहे. शनिवारपासून नगराध्यक्षा आणि नगरसेवकांच्या नावापुढे माजी हे पद लागणार आहे, त्यामुळे दोन दिवस नगरपालिकेतील वातावरण निरोपाची कामे उरकण्याचे दिसत आहे. सामान्य माणूस पालिकेकडील काम उरकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत होता.नवीन महानगर पालिकेच्या निवडणुकीची व नवीन आयुक्त कोण असणार याची सर्वत्र चर्चा रंगलेली दिसत होती. महाराष्ट्र शासनाने २६ सप्टेंबरला रात्री अधिसूचना काढून पनवेल नगरपालिका क्षेत्रासह २९ महसुली गावांची नवी महानगरपालिका १ आॅक्टोबरपासून अस्तित्वात येत असल्याची अधिसूचना काढली. त्यामुळे अस्तित्वात असलेली नगरपालिका शुक्र वार ३0 सप्टेंबर रोजी बरखास्त होणार आहे. पनवेल महानगरपालिका झाल्याने आता नवीन निवडणुका केव्हा होतील, सहा महिने लागतील का जास्त वेळ लागेल तोपर्यंत आयुक्तांचा कारभार असणार आहे. आयुक्तपदी आय.ए.एस. अधिकारी कोण असणार, शिंदे की जाधव याचीही चर्चा नगरपालिकेत रंगली आहे. अनेक महानगरपालिकेतील आयुक्तांच्या कारभाराच्या पध्दतीचे किस्से ऐकलेले असल्याने कर्मचारीही आतापर्यंत काम करण्याची असलेली मानसिकता बदलावी लागणार म्हणून धास्तावलेला दिसतो आहे. निवडणुकांना विलंब झाल्यास, सामान्य माणसाला यापुढे आपले काम लवकर होईल की नाही याची धास्ती वाटत आहे. याशिवाय शहरातील कर प्रणालीत वाढ होणार असून सोयी- सुविधा कशा प्रकारे मिळतील, याचीही चर्चा परिसरात होताना दिसते. निरनिराळे दाखले नेण्यासाठी व थकबाकी भरण्यासाठी लोकांच्या नगरपरिषदेत रांगा लागल्या होत्या.