शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या थांब्यावर खासगी वाहनांचे अतिक्रमण, वाशी वाहतूक चौकीसमोरील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:23 IST

Vashi : सायन-पनवेल महामार्गावर वाशी वाहतूक पोलीस चौकीसमोरच नियमांचे उल्लंघन सुरू असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीकडे पोलीसच दुर्लक्ष करत आहेत. वाशी वाहतूक पोलीस चौकीसमोर एसटी बसेसच्या थांब्यावर खासगी वाहने उभी राहात आहेत. अनधिकृतपणे टॅक्सी व रिक्षा स्टँड सुरू करण्यात आले असून त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नसल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. नवी मुंबईमधील वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. परंतु अनेक ठिकाणी पोलीस शिस्त लावण्याऐवजी मनमानीपणे दंड आकारणीकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. सायन-पनवेल महामार्गावर वाशी वाहतूक पोलीस चौकीसमोरच नियमांचे उल्लंघन सुरू असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. चौकीसमोर प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटीसाठी विनंती थांबा सुरू करण्यात आला आहे. येथे फक्त एसटी बसेस उभे राहणे अपेक्षित आहे. परंतु दिवसभर येथे रिक्षा व टॅक्सींचे अतिक्रमण असते. सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत खासगी प्रवासी बसेस अवैध उभी राहतात. याचा फटका एनएमएमटी व राज्य परिवहन उपक्रमास बसत असून प्रतिदिन हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक बंद केली तर राज्य परिवहन व महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या प्रवासी संख्येत दुप्पट वाढ होऊन उत्पन्नही वाढू शकते.वाहतूक चौकीसमोर खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी राहात असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथे अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. पोलीस चौकीसमोरच वाहतूक कोंडी होत असूनही पोलीस ठोस कार्यवाही करत नाहीत.

नागरिकांची नाराजीवाहतूक पोलीस चौकीसमोरच अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. चौकीसमोरच प्रतिदिन सायंकाळी सहा ते रात्री १२ पर्यंत वाहतूक कोंडी होत असते. खासगी बसेस राज्य परिवहन मंडळाच्या थांब्यावर थांबत असूनही त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई