शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना प्रोत्साहित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 00:14 IST

महापालिका आयुक्तांचे निर्देश ; मालमत्ता कर वसुलीच्या उद्दिष्टासाठी ॲक्शन प्लॅन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अभय योजनेअंतर्गत मालमत्ता कराच्या दंडात्मक रकमेवर नागरिकांना १५ मार्चपर्यंत ७५ टक्के सूट मिळणार आहे. यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिल्याने थकबाकीदारांपर्यंत पुन्हा प्रभावीपणे या संधीचा लाभ घेण्याविषयी विविध माध्यमांतून माहिती पोहोचविण्यात यावी अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. 

सन २०२०-२१ करिता मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ६२५ कोटी आहे हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने ३१ मार्चपर्यंत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक गांभीर्याने काम करावे असे मालमत्ता कर विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी निर्देश दिले. अभय योजनेअंतर्गत मालमत्ता कराच्या दंडात्मक रकमेवर १६ मार्चनंतर ३१ मार्चपर्यंत ५० टक्के सूट मिळणार असल्याने थकबाकीदारांनी ७५ टक्के सूट योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरा करावी तसेच सन २०२०-२१ मधील देयक रक्कम भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्चपर्यंत वाढविली असल्याने ही रक्कमही लवकरात लवकर भरावी.सन २०२०-२१ करिता मालमत्ता कर विभागाकरिता ६०० कोटी जमा होतील असे सुधारित उद्दिष्ट आयुक्तांनी जाहीर केले होते. सद्यस्थितीत यावर्षी ४५२.३५ कोटी इतकी रक्कम मालमत्ता करापोटी जमा झाली असून यापुढील २० दिवसात ६२५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार ॲक्शन प्लॅन तयार असून मालमत्ता कर विभागाच्या प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी आठ विभागांकरिता उद्दिष्ट ठरवून दिले आहेत. यामध्ये थकबाकीदारांची उतरत्या क्रमाने विभागनिहाय यादी तयार केली आहे. 

मालमत्ता कर भरणे बंधनकारकn१५ मार्चपर्यंत दंडात्मक रकमेवर ७५ टक्के सूट व त्यानंतर ३१ मार्चपर्यंत सूट कमी होऊन ५० टक्के होणार असल्याने या संधीचा लाभ जास्तीत जास्त थकबाकीदारांनी घ्यावा यासाठी ठोस प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. nलघु उद्योजकांनीही त्यांची मूळ मालमत्ता कर रक्कम भरावी याकरिता कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले. मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा स्त्रोत असून त्याचा भरणा करणे हे प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहे. त्यामुळे मालमत्ता कर विभागाने पूर्ण क्षमतेने नियोजनबद्ध काम करावे असे सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई